Corona virus: 1 thousand 621 corona infections increased on friday in Pune city ; 62 people died | Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ६२१ कोरोनाबाधितांची वाढ ; ६२ जणांचा मृत्यू

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ६२१ कोरोनाबाधितांची वाढ ; ६२ जणांचा मृत्यू

पुणे : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत प्रशासकीय यंत्रणा आता घरा-घरापर्यंत पोहचू लागली असून, यात कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना लागलीच कोविड-१९ ची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढले असून, शुक्रवारी तब्बल ६ हजार १४२ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ आज प्राप्त झालेल्या चाचणी अहवालात १ हजार ६२१ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १ हजार २५६ कोरोनाबधित कोरोनामुक्त झाले आहेत़ तर शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९४९ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ यापैकी ५२३ जण व्हेंटिलेटरवर, ४२६ जण आयसीयूमध्ये तर ३ हजार ५१९ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात  ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहेत.
    शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आजपर्यंत १ लाख ३८ हजार ९५१ वर गेली असून, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या १७ हजार ७७३ इतकी आहे़ तसेच आतापर्यंत १ लाख १७ हजार ८८२ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात ३ हजार २९६ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.        
        ----------------------------------

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus: 1 thousand 621 corona infections increased on friday in Pune city ; 62 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.