Corona Virus : पुणे जिल्ह्यात तपासण्यांचा वेग वाढवण्यासाठी १ लाख ९० हजार अँटिजेन कीट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:38 PM2021-05-04T20:38:42+5:302021-05-04T20:38:59+5:30

नव्या पुरवठा दाराकडे मागणी नोंदवली : हाफकिन संस्था करणार दर निश्चित

Corona Virus :1 lakh 90 thousand antigen insects will be procured in Pune district to speed up the investigation | Corona Virus : पुणे जिल्ह्यात तपासण्यांचा वेग वाढवण्यासाठी १ लाख ९० हजार अँटिजेन कीट घेणार

Corona Virus : पुणे जिल्ह्यात तपासण्यांचा वेग वाढवण्यासाठी १ लाख ९० हजार अँटिजेन कीट घेणार

Next

पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा स्थितीत नवे रूग्ण शोधण्यासाठी अँटिजेन चाचण्या आणि आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. मात्र, काही दिवसांपासून अँटीजन कीटचा तुटवडा असल्यामुळे या चाचण्या बंद होत्या. परिणामी आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. अँटिजेन किटचा तुटवडा भरून काढण्यासाठी नव्या पुरवठादाराकडे जवळपास १ लाख ९० हजार अँटिजेन कीटची मागणी केली असून येत्या दोन ते दिवसांत या किटचा पुरवठा जिल्ह्याला होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापुरकर यांनी दिली.

कोराेनाबाधितांची चाचणी करण्यासाठी अँटिजेन चाचण्या जिल्ह्यात सुरू होत्या. त्यासोबतच आरटीपीसीआर चाचण्याही सुरू होत्या. मात्र, अँटिजेन किट संपल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अँटीजन चाचण्या बंद झाल्या. त्यात नव्या अँटिजेन किटची मागणी आरोग्य विभागामार्फत नोंदवण्यात आली होती.

मात्र, 'हाफकिन' संस्थेने या किटचे दर ५६ रूपये ठरवून दिली असतांनाही कीट उपलब्ध नसल्याने या किटच्या किमंती ५६ वरून १२३ रूपयांपर्यंत गेली होती. यामुळे जुन्या पुरवठा दाराने ५६ रूपयांने किट पुरवण्यास नकार दिला. यामुळे नव्या दराने अँटिजन कीट खरेदीसाटी साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात हाफकिन संस्थेशी चर्चा करून नवे दर निश्चित करून नव्या पुरठा दाराकडून किट खरेदी केले जाईल असे ठरले. त्यानुसार लवकरच नव्या पुरवठा दाराला १ लाख ९० हजार डोसची ऑर्डर दिली जाणार आहे, या तील १० हजार किट दोन दिवसांत जिल्ह्याला मिळेल असे, नांदापुरकर म्हणाले.

Web Title: Corona Virus :1 lakh 90 thousand antigen insects will be procured in Pune district to speed up the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.