Corona Vaccine News : पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 23 हजार कोरोना लसीच्या डोसची गरज : डाॅ.राजेश देशमुख 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:26 AM2021-01-13T11:26:24+5:302021-01-13T11:26:56+5:30

पहिल्या टप्प्यात शासनाकडून किती मिळणार हे आज कळणार 

Corona Vaccine News :2 lakh 23 thousand corona vaccine dose required for Pune district: Dr. Rajesh Deshmukh | Corona Vaccine News : पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 23 हजार कोरोना लसीच्या डोसची गरज : डाॅ.राजेश देशमुख 

Corona Vaccine News : पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 23 हजार कोरोना लसीच्या डोसची गरज : डाॅ.राजेश देशमुख 

Next
ठळक मुद्दे शहर आणि जिल्ह्यात तब्बल 1 लाख 10 हजार 434 कर्मचाऱ्यांना या लसीचा लाभ देण्यात येणार

पुणे : शासनाच्या आदेशानुसार शहर आणि जिल्ह्यात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यासाठी दोन टप्प्यात लसीकरण करण्यासाठी तब्बल 2 लाख 23 हजार कोरोना डोस लागणार आहेत. परंतु पुणे जिल्ह्याला नक्की किती डोस मिळणार हे बुधवारी मुंबईत होणा-या आढावा बैठकीनंतर निश्चित होईल,  अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली. 

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील करोना लसीकरणाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार पहिल्या टप्प्यात सर्व खाजगी व सरकारी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यामध्ये शहर आणि जिल्ह्यात तब्बल 1 लाख 10 हजार 434 कर्मचाऱ्यांना या लसीचा लाभ देण्यात येणार आहे.  लसीकरणासाठी जिल्ह्यात  एकूण 55 केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यात मग्रामीण भागात २३, पुणे महापालिका परिसरात १६ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात १६ केंद्राचा समावेश आहे. 

शासनाच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणामध्ये 28 दिवसांच्या अंतराने दोन डोस देण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात  शहर, ग्रामीण भागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात आजार असलेले आणि वयोवृद्धांना प्राधान्य । देण्यात येणार आहे. 
-----
- प्रत्येक आरोग्य कर्मचा-याला दोन डोस प्रमाणे अपेक्षित लस डोस  : 2 लाख 23 हजार 77
- शरह आणि जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्र : 55
- सरकारी,खाजगी आरोग्‍य कर्मचारी : 1 लाख 10 हजार 434
- लसीकरणासाठी नियुक्त कर्मचारी : 2 हजार 546

Web Title: Corona Vaccine News :2 lakh 23 thousand corona vaccine dose required for Pune district: Dr. Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.