Corona Vaccination Pune : पुण्यात सोसायटी, क्लब हाऊसमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 11:56 AM2021-05-02T11:56:18+5:302021-05-03T23:50:10+5:30

वाघोलीत शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाकडून लसीकरणाच्या मार्गदर्शक नियमावलीचं उल्लंघन; जिल्हा परिषदेने दिले चौकशीचे आदेश...

Corona Vaccination Pune: Vaccination programme at out-of-center society, club house in Pune; MP Amol Kolhe brought the matter on front | Corona Vaccination Pune : पुण्यात सोसायटी, क्लब हाऊसमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम

Corona Vaccination Pune : पुण्यात सोसायटी, क्लब हाऊसमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम

Next

पुणे: पुणे शहर,पिंपरी चिंचवड,आणि ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे.मात्र लसींच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच दरम्यान राजकीय स्थानिक प्रतिनिधींच्या अट्टहासामुळे लसीकरणाच्या कामात मोठा गोंधळ उडाला आहे. लसीकरणाबाबत काढण्यात आलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे उल्लंघन करत वाघोली कोविड केंद्राबाहेर पूर्वरंग सोसायटी व क्लब हाऊसमध्ये लसीकरण सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

पुण्यात कोरोना लसीकरणाचा आजपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. लसीकरणासाठी ऑफलाईन, ऑनलाईन नोंदणी करून नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहे. तर दुसरीकडे लसींचा अपुरा पुरवठा होतो आहे. त्यामुळे  नागरिकांना कित्येक तास रांगेत उभे राहून रिकाम्या हातानेच माघारी फिरावे लागत आहे. आधी कोरोना लसीविषयी नागरिकांच्या मनात भीती असल्याने त्यांना लसीकरणासाठी आग्रह करण्यात येत होता.पण आता लोक मोठ्या संख्येने लसीकरणाला प्रतिसाद देत आहे. पण वाघोलीत जिल्हा परिषदेचे कोविड लसीकरण केंद्र सुरू आहे. तिथे मागील एक दोन दिवसात या केंद्राबाहेर जाऊन पूर्वरंग सोसायटी आणि क्लब हाऊसमध्ये लसीकरणाची मोहीम राबविली जात असल्याची बाब समोर आली आहे.

जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके तसेच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांच्या नावाने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बाबत संपर्क साधला असता ज्ञानेश्वर कटके म्हणाले, मी जिल्हा परिषद सदस्य असल्याने माझ्यावर परिसरातील २० ते २५ गावांची जबाबदारी आहे. आमच्या भागात  आजतागायत व्यवस्थित लसीकरण सुरू आहे.अगदी डेक्कन,वडगाव शेरी, येरवडा, विमाननगर येथून लसीकरणासाठी नागरिक येत आहे. मात्र लसीकरण केंद्रावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने कोरोनाचा प्रसार थांबवण्या ऐवजी वाढण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे.आणि लोकांना लसीकरणासाठी केंद्रावर आणण्याच्या व्यवस्थेला पण मर्यादा आहे. कुणी आजारी आहे, कुणाला इथपर्यंत येणे शक्य नाही अशा अनेक अडचणी समोर येत आहेत. मग त्यावर मात करण्यासाठी काहीतरी पर्यायी मार्ग शोधावे लागतात. परिसरात सर्वात जास्त योग्य आणि सुरक्षितपणे व जास्तीत जास्त लसीकरण कुठे सुरू असेल तर ते वाघोलीत आहे.

https://twitter.com/bhaleropratiksh/status/1388451361830830086?s=24

यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद म्हणाले, कोरोना लसीकरणाच्या बाबतीत वाघोलीत घडलेला हा प्रकार लसीकरण मार्गदर्शक नियमावलीचे उल्लंघन करणारा आहे. हा प्रकार मागील 3 ते चार दिवसांपासून सुरू आहे. त्यात जास्त लसीकरण झालेले नाही. मात्र या घटनेची मी गंभीर दखल घेतली असून गट विकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
 

Web Title: Corona Vaccination Pune: Vaccination programme at out-of-center society, club house in Pune; MP Amol Kolhe brought the matter on front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.