Corona Vaccination Pune : शहरात शनिवारी ५३ केंद्रांवर कोविशिल्ड १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:36 PM2021-06-11T21:36:32+5:302021-06-11T21:37:12+5:30

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे

Corona Vaccination Pune: Covishield vaccine available at 53 centers in the city on Saturday | Corona Vaccination Pune : शहरात शनिवारी ५३ केंद्रांवर कोविशिल्ड १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार

Corona Vaccination Pune : शहरात शनिवारी ५३ केंद्रांवर कोविशिल्ड १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार

Next

पुणे : शहरातील महापालिकेच्या ५३ केंद्रांवर आज ( शनिवार दि. १२ जून) कोव्हिशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत. 

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. याव्दारे कोविशिल्ड करिता केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणी करता येणार असून, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी १५ मे पूर्वी घेतला आहे त्यांनाही नोंदणी करता येणार आहे.

कोविशिल्ड लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी ६० टक्के लस या आॅनलाईन अपॉईमेंट घेतलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़ तर उर्वरित शिल्लक लस ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ४५ नागरिकांना ऑन स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाईल. तसेच ८४ दिवसांपूर्वी (२० मार्चपूर्वी) पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोसही आज उपलब्ध राहणार आहे.
-----
१५ मे पूर्वी डोस घेतलेल्यांना  कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध 
ज्या नागरिकांनी १५ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़  यातील ६० टक्के लस ही आॅनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही आॅनस्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे़ कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.

Web Title: Corona Vaccination Pune: Covishield vaccine available at 53 centers in the city on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.