पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; अंतिम वर्षासाठी 50 गुणांची परीक्षा, वेळापत्रकही ठरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 07:44 PM2020-05-24T19:44:16+5:302020-05-24T19:46:38+5:30

अंतिम वर्षाच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास २७  दिवस लागतात. परंतु , जुलै महिन्यात केवळ 50 गुणांची परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे एका दिवसात दोन दोन किंवा तीन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

Corona news Big decision of Pune University; Exam of 50 marks for final year hrb | पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; अंतिम वर्षासाठी 50 गुणांची परीक्षा, वेळापत्रकही ठरले

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; अंतिम वर्षासाठी 50 गुणांची परीक्षा, वेळापत्रकही ठरले

Next

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा फिजिकल डिस्टन्सिगचे नियम पाळून येत्या १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावरच ही परीक्षा असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस. उमराणी यांनी सांगितले.


राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी सुरु केली आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षांचे स्वरूप निश्चित करण्यात आले. विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तीन तासांनी ऐवजी आता दिड तासांची असेल. विद्यापीठातर्फे जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत काही विद्यार्थी प्रविष्ट होऊ शकले नाही तर उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष परीक्षा घेण्याची तयारी सुद्धा विद्यापीठाने ठेवली आहे.


डॉ.उमराणी म्हणाले,सुरूवातीला अंतिम वर्षाच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या १ ते १५ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. तर 16 ते 31 जुलै या कालावधीत नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेमध्ये एका वाक्यात उत्तरे द्या ,शॉर्ट नोट्स ,एमसीक्यू अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. लॉक डाऊन जाहीर होण्यापूर्वी वर्गामध्ये शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमावरच परीक्षा घेतली जाईल.


अंतिम वर्षाच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास २७  दिवस लागतात. परंतु , जुलै महिन्यात केवळ 50 गुणांची परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे एका दिवसात दोन दोन किंवा तीन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकी पंधरा दिवसांच्या कालावधीत बॅकलॉगची व नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल,असे नियोजन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.


अंतिम वर्षाच्या अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची मागणी आहे. पुढील शिक्षण व रोजगाराच्या दृष्टीने याची परीक्षा आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे, असेही उमराणी यांनी सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले पण फेसबुकद्वारे जोडणारा झकरबर्ग मालामाल झाला

CoronaVirus अडेलतट्टू चीन नरमला; तातडीने कोरोना जन्माच्या तपासाला तयार झाला

चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

CoronaVirus रक्तदात्यांनो! महाराष्ट्राला तुमची गरज आहे; उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती

Lockdown 4 : दीड महिन्याने यथेच्छ दारुचे प्राशन; घरी येताच मृत्यू

खतरनाक Video! अमेरिकेच्या नौदलाकडे नवे संहारक शस्त्र; दारुगोळ्याशिवाय विमान केले नष्ट

 

Web Title: Corona news Big decision of Pune University; Exam of 50 marks for final year hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.