आधी आर्थिक मंदीमुळे आणि आता कोरोनामुळे घटले बांधकाम प्रस्ताव, पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 06:19 AM2020-06-04T06:19:00+5:302020-06-04T06:20:02+5:30

बांधकाम व्यावसायिकांना सवलती देण्याची आवश्यकता

Construction proposals fell first due to the economic downturn and now due to the corona | आधी आर्थिक मंदीमुळे आणि आता कोरोनामुळे घटले बांधकाम प्रस्ताव, पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम

आधी आर्थिक मंदीमुळे आणि आता कोरोनामुळे घटले बांधकाम प्रस्ताव, पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम

Next

आधी आर्थिक मंदीमुळे आणि आता कोरोनामुळे घटले बांधकाम प्रस्ताव

पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम 

लक्ष्मण मोरे

पुणे : गेल्या काही वर्षांपासून असलेल्या आर्थिक मंदीमुळे आणि नंतर रेरा कायद्यामुळे कमी झालेले बांधकाम प्रस्ताव कोरोनामुळे आणखीनच कमी झाले असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. १ एप्रिलपासून ३१ मे पर्यंत अवघे १२ ते १५ प्रस्तावच पालिकेकडे दाखल झाले असून पालिकेला अवघे १ कोटी ७३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अधिकाधिक प्रस्ताव येण्याकरिता आगामी काळात व्यावसायिकांना काही सवलती देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 
गेल्या तीन चार वर्षात बांधकाम व्यवसाय आर्थिक मंदीमुळे खाली आला. त्यानंतर रेरा कायदा लागू झाल्यापासून पालिकेकडे परवानगीसाठी येणाºया प्रस्तावांमध्ये जवळपास ३० टक्क्यांची घट झाली. पालिकेच्या बांधकाम विभागाला ठरवून देण्यात आलेले आर्थिक लक्ष्यही साध्य करणे अवघड झाले आहे. 
पुण्यामध्ये आयटी कंपन्यांचे आगमन होऊ लागल्यावर पुण्याच्या उपनगरांचा झपाट्याने विस्तार झाला. उपनगरांमध्ये बांधकामाची लाटच आली. यासोबतच टाऊनशिप उभ्या राहिल्या. काही वर्षांपूर्वी शहरातील बांधकाम व्यवसायात आलेली मोठी तेजी आली होती. सुरुवातीला प्रतिसाद मिळालेला हा व्यवसाय मात्र गेल्या काही वर्षांत आर्थिक मंदीमुळे कमी झाला. त्यातच रेरा कायदा आणि जीएसटी आल्यामुळे व्यवसायाचे कंबरडे मोडल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
त्यातच आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र कर्फ्यु लावण्यात आला. पुण्यातील अन्य उद्योग व्यवसायांप्रमाणे बांधकाम व्यवसायही ठप्प झाला. जवळपास तीन महिने हा व्यवसाय बंद असल्याने कामगारांच्या रोजगराचाही प्रश्न निर्माण झाला. बांधकाम मजूर मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावी निघून गेले आहेत. लोकांकडे सध्या पैसे नसल्याने आणि आहेत ते पैसे जपून वापरावे लागत असल्याने नवीन घरांना आगामी वर्षभर कशी मागणी राहील याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 
महापालिकेच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सदनिका रिकाम्या पडलेल्या असतानाही घरांच्या किमती मात्र अद्यापही कमी झालेल्या नाहीत. घरांच्या मागणीअभावी या व्यवसायातील गुंतवणुकीचा ओघ घटल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे दरवर्षी नवीन आणि पुनर्विलोकनासाठीचे शेकडो प्रस्ताव दाखल होत असतात. परंतु, गेल्या दोन महिन्यात अवघे १२ ते १५ प्रस्तावच दाखल झाले आहेत. त्यामधून अगदी तुटपुंजे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीही अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न पालिकेला मिळाले होते. पालिकेने शासनाच्या निर्देशानुसार काही अटी घालत बांधकाम व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, सध्या कामगार मिळत नसल्याने काम सुरू करणे अवघड झाले आहे. बांधकाम व्यावसायिकांना विकसन शुल्कामध्ये सवलत देणे, दोन-तीन हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची परवानगी देणे आदी सवलती दिल्यास काही प्रमाणात फरक पडू शकेल असा अंदाज बांधला जात आहे.
-----------------
मंदीच्या झळा सोसत असतानाच आता बांधकाम व्यावसायिक कोरोनामुळे अधिक अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. रेरा, जीएसटीमुळेही व्यवसायाला फटका बसला आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सिमेंट विक्रेते, हार्डवेअर, वीज, वाळू, डस्ट व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.
------------------
पालिकेकडील दाखल प्रस्ताव
वर्ष                  एकूण दाखल नवीन प्रस्ताव प्रस्ताव

२०१७-१८-        ७५२
२०१८-१९ - .     ७४३
२०१९-२०-        ७२६
२०२०-२१ - .     १५ (मे अखेर)

पालिकेचे घटत चाललेले उत्पन्न
वर्ष             अपेक्षित उत्पन्न (कोटीत)     प्रत्यक्ष उत्पन्न (कोटीत)
२०१५-१६            ७५१                              ७४४
२०१६-१७            १०४५                            ७४४
२०१७-१८            ११६५                            ५८०
२०१८-१९            ८१५                              ६५४
२०१९-२०            ८९९                              ७७० 
२०२०-२१ ७५० १.७३ (मे अखेर)

Web Title: Construction proposals fell first due to the economic downturn and now due to the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.