पुण्यात काँग्रेस गटबाजीचे ग्रहण कायम : राजीव गांधी जयंतीमध्येही वेगवेगळी चूल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 09:23 PM2019-08-22T21:23:03+5:302019-08-22T21:25:39+5:30

सन २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे शहरातील नेते डोळे उघडायला तयार नाहीत. राजीव गांधी जयंतीनिमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार चुली मांडून पक्षातील गटबाजी कायम असल्याचेच दाखवून दिले गेले. Congress facing groupism in Pune

Congress facing groupism in Pune | पुण्यात काँग्रेस गटबाजीचे ग्रहण कायम : राजीव गांधी जयंतीमध्येही वेगवेगळी चूल

पुण्यात काँग्रेस गटबाजीचे ग्रहण कायम : राजीव गांधी जयंतीमध्येही वेगवेगळी चूल

Next

पुणे : सन २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे शहरातील नेते डोळे उघडायला तयार नाहीत. राजीव गांधी जयंतीनिमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार चुली मांडून पक्षातील गटबाजी कायम असल्याचेच दाखवून दिले गेले. पक्षाची संघटना शक्तीहिन झाली असून नव्या कार्यकर्त्यांचा पक्षाकडे येण्याचा ओघही थांबला आहे. नेते निवांत व कार्यकर्ते त्यांच्या पेक्षाही निवांत असे चित्र निर्माण झाले आहे.
संपुर्ण शहरावर राजकीय वर्चस्व असलेला काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षात शहरात मोडकळीस आला आहे. लोकसभेच्या निवडणूकीत कसेबसे बळ एकवटून उभ्या राहिलेल्या पक्षाला सव्वा तीन लाखपेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला. तरी अजूनही पक्षाचे नेते एकत्रितपणे काही करण्याऐवजी स्वतंत्रपणे आपापल्या भागात पक्षाच्या नावे कार्यक्रम घेत आहे. त्यांच्यापैकी कोणीही दुसºयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. अन्य ठिकाणी कार्यक्रम केले ते काँग्रेस भवनात फिरकले नाहीत. त्यामुळे चार कार्यक्रम होऊनही पक्षाचे नाव मात्र कुठेच झाले नाही. परिणामी काँग्रेस भवन ओस व प्रभागही ओस अशी काँग्रेसची अवस्था झाली.
काँग्रेसचे अजून कशातच काही नाही असेच चित्र आहे. विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत, मात्र त्यांना संघटनेच्या कामात रस नाही, दोन्ही आमदार बहुसंख्यवेळा मुंबईतच असतात.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण तसेच अन्य काही नेत्यांवर पुणे शहराची जबाबदारी दिली आहे. मात्र त्यांनी पुण्यात लक्ष घातल्याचे दिसलेले नाही.
प्रदेशाध्यक्षपदी नवी नियुक्ती झाल्यानंतरही पुण्यातील पक्षाच्या स्थितीत फरक पडलेला नाही. पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांचे प्रमाण कमी झाले आहे. महापालिकेत पक्षाचे फक्त ९ नगरसेवक आहेत. त्यांच्याकडून पक्षवाढीचे काही घडताना दिसत नाही. युवक, महिला, मागासवर्गीय, कामगार अशा पक्षाच्या सर्वच आघाड्यांमध्येही अशीच स्थिती असल्याचे दिसते. पक्षाचे तळातील कार्यकर्तेही आता अगदी उघडपणे भाजपासमोर आपला टिकाव लागणार का असा प्रश्न विचारू लागले आहेत. काँग्रेस टिकणार नाही असा विचार करून नव्याने पक्षाकडे येणाºया युवा कार्यकर्त्यांचा ओघही आता कमी झाल्याचे पक्षाचे वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारीच खासगीत सांगत असतात.

Web Title: Congress facing groupism in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.