१६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करुन केला अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 03:54 PM2021-04-08T15:54:49+5:302021-04-08T15:55:00+5:30

अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही केले लग्न...

Committed marriage with a 16-year-old girl and sexual abuse; Crime filed against the youth | १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करुन केला अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

१६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करुन केला अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही १६  वर्षांच्या मुलीसमवेत लग्न करुन तिच्यावर अत्याचार करुन गर्भवती करण्याचा प्रकार समोर आला आहे. 

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी नागेश दशरथ लांडगे (वय २५, रा. साठेनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारीपासून ६ एप्रिलपर्यंत पिडिताच्या घरी तसेच आरोपीच्या घरी घडला. 

याप्रकरणी सहायक फौजदार मुनीर अब्बाज इनामदार यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नागेश लांडगे याने एका १६ वर्षांच्या युवतीबरोबर लग्नापूर्वी तिच्या घरी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याबरोबर लग्न केले. तिच्यावर अत्याचार करुन तिला गर्भवती केले.

वानवडी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Committed marriage with a 16-year-old girl and sexual abuse; Crime filed against the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.