शहरात प्लास्टिक, थर्माकॉल वापरण्यास पूर्णपणे बंदीचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 05:52 PM2019-08-29T17:52:51+5:302019-08-29T17:59:17+5:30

शहरातील पाण्याचे स्त्रोत, तलाव, नद्या, नाले व पावसाळी गटारे यामध्ये कोठेही कचरा दिसत नसल्याचा हास्यास्पद दावा प्रशासनाने केला आहे.

The city claims to completely ban the use of plastic, thermocol | शहरात प्लास्टिक, थर्माकॉल वापरण्यास पूर्णपणे बंदीचा दावा 

शहरात प्लास्टिक, थर्माकॉल वापरण्यास पूर्णपणे बंदीचा दावा 

Next
ठळक मुद्देभाग -२ सेव्हन स्टार दर्जाची स्वच्छता- शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा

पुणे : संपूर्ण शहरामध्ये अविघटनशील प्लास्टिक बॅग्ज, पुनर्वापरास अयोग्य प्लास्टिक, स्टायलोफॉर्म, थर्माकोलच्या वापरास पूर्णपणे बंदी असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मुख्यसभेला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये म्हटले आहे. याशिवाय शहरातील पाण्याचे स्त्रोत, तलाव, नद्या, नाले व पावसाळी गटारे यामध्ये कोठेही कचरा दिसत नसल्याचा ठोस दावा केला आहे. परंतु आयुक्त सौरभ राव यांनी केलेले दावे कागदावरच आणि फसवे असल्याचे '' लोकमत'' च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.
    केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण सन २०१९ मध्ये पुणे महापालिकेने देखील सहभाग घेतला आहे. परंतु प्रशासनाकडून शहरामध्ये ग्राऊंड लेव्हलला जाऊन प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा पुरस्कार मिळविण्यासाठी कार्यालयामध्ये बसून व  सल्लागारांच्या मार्फत कागदे रंगविण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. यामध्ये शहराला सेव्हन स्टार मिळण्यासाठी तुमच्या शहरामध्ये शंभर टक्के प्लास्टिक, थर्माकॉल बंदी असणे आवश्यक आहे. परंतु आजही शहरामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरु आहे. शहरातील सर्व भाज्यामंडई, लहान-मोठे व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्याचा वापर सुरु आहे. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरामध्ये सर्वत्र सर्रास व मोठ्या प्रमाणामध्ये थमार्कोलचा वापर सुरु असल्याचे लोकमतच्या पाहणीमध्ये निदर्शनास आले. 
    याशिवाय शहरातील पाण्याचे स्त्रोत, तलाव, नद्या, नाले व पावसाळी गटारे यामध्ये कोठेही कचरा दिसत नसल्याचा हास्यास्पद दावा प्रशासनाने केला आहे. परंतु शहराच्या मध्यवस्तीमधून जाणारे पिण्याचे पाण्याचा मुठा उजवा कालव्याच्या दोन्ही बाजूने कच-याचे मोठ्या मोठे ठिग असल्याचे सर्वत्र दिसते. तर शहरातील मुळा-मुठा नद्यांची झालेली गटार गंगा पुणेकर रोज आपल्या डोळ््यानेच पहात आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षांत कात्रज, पाषण तलावांमध्ये थेड सोडपाणी सोडण्यात येत असून, याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे हे तलाव जलपर्णीमय होऊन गेले आहेत. शहरातील ओढे-नाले तर कचरा टाकण्यासाठीच्या हक्काच्या जागांच असल्याचे दिसून आले. 
    तर सार्वजनिक ठिकाणी, पावसाळी नाले, पाण्याचे स्त्रोत आदी ठिकाणी अस्वच्छता करणा-यांवर नियमित दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु महापालिकेच्या मुख्य इमरतीसह शहरात अनेक ठिकाणी थुंकडे, कचरा टाकण्याचे प्रकार सुरुच आहेत. महापालिका प्रशासनाकडून अस्वच्छता करणा-यावर कारवाई करण्यात येते, परंतु ही कारवाई देखील केवळ पुरस्कारांसाठी आकडेवारी दाखविण्यासाठीच असल्याचे शहरातील सार्वजनिक स्वच्छता पाहिल्यावर स्पष्ट होते. यामुळे  प्रशासनाने सेव्हन स्टार मिळविण्यासाठी केलेले दावे कसे खोटे आणि फसवे असल्याचे स्पष्ट होते. 
------------------------
लोका सांगे .. 
न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली. महापालिकेच्या वतीने पुणे शहरामध्ये प्लास्टिक बंदी लागू केली. परंतु सुरुवातील काही महिने प्रशासनाकडून नियमित  कारवाई करून कडक अंमलबजावणी सुरु केली होती. परंतु सहा महिन्यांनंतर महापालिकेकडून ही प्लास्टिक बंदी पायदळी तुडविण्यात येत असून, महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्याचे वाटप करणे आणि आता तर थेट प्लास्टिक पिशव्यांचे वाटप देखील सुरु झाले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाचा कारभार म्हणजे लोका सांगे.. आपण मात्र... असा झाला आहे. 

Web Title: The city claims to completely ban the use of plastic, thermocol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.