अबब ! गुन्ह्यांचे 'शतक' ठोकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 08:56 PM2020-09-09T20:56:32+5:302020-09-09T20:57:11+5:30

लॉकडाऊन सुरु झाला त्याचदिवशी २४ मार्च २०२० रोजी तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता..

Chandannagar Police was arrested Criminal who completed 100 crime on regsitred | अबब ! गुन्ह्यांचे 'शतक' ठोकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद

अबब ! गुन्ह्यांचे 'शतक' ठोकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद

Next

पुणे : १९८४ पासून गुन्हेगारीत असलेल्या व १०० वर गुन्हे केलेल्या एका सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. 
राजू बाबुराव जावळकर (वय ५५, रा. खानापूर, सिंहगड रोड) असे त्याचे नाव आहे.आता त्याच्याकडून ट्रक, टेम्पो व दुचाकी चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आणण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. 
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून टेम्पो चोरीला गेला होता. त्याचा तपास सीसीटीव्हीवरुन करीत असताना पोलीस नाईक तुषाभ भिवरकर व पोलीस शिपाई विक्रांत सासवडकर यांना राजू जावळकर हा खेड शिवापूर टोलनाक्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला तेथे पकडले. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजल्यावर त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर त्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून ७ वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुल दिली आहे. 
चंदननगर, खडक, वारजे येथील चार टेम्पो चोरुन त्याने ते दिनेश रामसिंग वसावा (वय २४, रा. अंकलेश्वर, गुजरात) या भंगार विक्रेत्याचा विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या गाड्यांंचे इंजिन पुराव्याकामी जप्त केले आहे.
याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले की, राजू जावळकर हा १९८४ पासून चोऱ्या करत आहे. त्याच्याकडून आतापर्यंत वेगवेगळ्या वेळी किमान ९५ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षाही लागली आहे. देशात लॉकडाऊन सुरु झाला त्याचदिवशी २४ मार्च २०२० रोजी तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता. अनलॉक सुरु होताच तो पुन्हा चोऱ्या करु लागला. 
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश पासलकर, सहायक निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक सचिन जाधव, हवालदार अजित धुमाळ, तुषार भिवरकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अतुल जाधव यांनी केली आहे.
़़़़़़़़
एकाच प्रकारच्या करायचा चोऱ्या
राजू जावळकर हा प्रामुख्याने एकाच प्रकारच्या चोऱ्या करतो. दुचाकी, टेम्पो, पिकअ‍ॅप व्हॅन तो प्रामुख्याने चोरतो. वाहन चोरल्यानंतर त्या वाहनांचे पार्ट कटींग करुन तो भंगार विक्रेत्यांना विकत असे. इंजिनावरील इंजिन नंबर खोडून पुरावा नष्ट करीत असे.

Web Title: Chandannagar Police was arrested Criminal who completed 100 crime on regsitred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.