गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध; खेड तालुक्यात शिवसैनिक आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:01 PM2020-09-16T23:01:29+5:302020-09-16T23:06:09+5:30

भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे.

Central government protests with onion garland around neck; Khed Shiv Sainik aggressive | गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध; खेड तालुक्यात शिवसैनिक आक्रमक 

गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध; खेड तालुक्यात शिवसैनिक आक्रमक 

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन

राजगुरुनगर: केंद्र सरकारनेकांदा निर्यात बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने व निषेध नोंदवला जात आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुका शिवसेनेच्या वतीने गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध करून व कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी तहसीलदार कचेरीसमोर आंदोलन केले.
        लॉकडाऊनच्या काळात कवडीमोल भावाने आपला शेतमाल विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना ह्या आठवड्यात कांद्याला ३ हजार ते ४ हजारपर्यंत उच्चांकी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खेड तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने कांद्यावरील बंदी ताबडतोब हटवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कांदा निर्यात बंदी तात्काळ न उठल्यास कोरोनाच्या गंभीर परिस्थितीही ही पुन्हा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षा व शिवसेनेच्या नेत्या विजयाताई शिंदे, जिल्हा सल्लागार प्रकाश वाडेकर पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे उपसभापती ज्योती आरगडे, भगवान पोखरकर, पंचायत समिती सदस्या सुनिता सांडभोर, सुरेश चव्हाण,नंदा कड, किरण गवारे, बापुसाहेब थिटे, लक्ष्मण जाधव,एल, बी तनपुरे, पांडुरंग गोरे. दिलिप तापकिर, यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनचे कार्यकत्ये उपस्थित होते. दरम्यान नायब तहसिलदार राजेश कानसकर यांना निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.

Web Title: Central government protests with onion garland around neck; Khed Shiv Sainik aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.