बारामतीत 'कोविड-१९' चाचणीला केंद्र शासनाची मान्यता; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घातले होते लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 05:38 PM2020-05-27T17:38:41+5:302020-05-27T18:21:16+5:30

बारामती शहरात वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा उद्यापासुन होणार कार्यान्वित

Central Government approves Covid-19 test in Baramati | बारामतीत 'कोविड-१९' चाचणीला केंद्र शासनाची मान्यता; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घातले होते लक्ष

बारामतीत 'कोविड-१९' चाचणीला केंद्र शासनाची मान्यता; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घातले होते लक्ष

Next
ठळक मुद्देप्रयोगशाळेला मान्यता मिळाल्याने आता कोविड १९चे बारामतीमध्येच निदान होणार बारामती येथील संशयित रुग्णांना पुणे येथील तपासणी यंत्रणेवर लागत होते अवलंबुनआता रुग्णांना १५ ते २० तासांमध्ये कोरोना तपासणीचा अहवाल दिला जाईल.

बारामती : बारामती शहरातील  कोविड-१९  चाचणीला केंद्र शासनाने  मान्यता दिली आहे.त्यानुसारबारामती शहरात वैद्यकीय महाविद्यालयात उभारलेली प्रयोगशाळा उद्यापासुन होणार कार्यान्वित होणार आहे.याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजीवकुमार तांबे यांनी माहिती दिली. प्रयोगशाळेला मान्यता मिळाल्याने आता कोविड १९ चे बारामतीमध्येच निदान होणार आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभुमीवर राज्यात बारामतीसह सहा ठिकाणी कोविड-१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल)सुरु करण्यास राज्य शासनाने १६ एप्रिल रोजी  मान्यता दिली. त्यानुसार आता शहरातील कोरोना संशयिताच्या तपासणीसाठी शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.या प्रयोगशाळेची नागपुर येथील  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. मिना मिश्रा यांनी पाहणी केली होती.या पाहणीनंतर मिश्रा यांनी या प्रयोगशाळेत कोविड १९ च्या तपासणीसाठी आवश्यक योग्य सुविधा असल्याचा अहवाल दिला आहे.तसेच बारामतीत कोविड-१९  चाचणी केंद्र शासनाने  मान्यता दिल्याचे कळविले आहे.त्यामुळे बारामती शहरात वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा उद्यापासुन होणार कार्यान्वित होणार आहे.


 बारामती येथील संशयित रुग्णांना पुणे येथील तपासणी यंत्रणेवर अवलंबुन राहावे लागत होते .पुणे येथे संशयित रुग्ण नेणे—आणणे,तपासणीची प्रक्रिया वेळखाऊ आहे.त्यामुळे बारामती येथे संबंधित प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी होती . ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने पूर्ण झाली आहे.
याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीवकुमार तांबे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेली कोविड १९ ची तपासणी प्रयोगशाळा गुरूवार (दि. २८) पासून कार्यान्वित होणार आहे. याची पूर्ण तयारी झाली असून याबाबत केंद्र सरकारची मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे उद्यापासून कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कातील ल तसेच कोरोना संशयितांचे स्वॅब रूई येथील कोविड रुग्णालयात घेतले जातील.त्यानंतर ते स्वॅब वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासली जातील.त्यामुळे आता रुग्णांना १५ ते २० तासांमध्ये कोरोना तपासणीचा अहवाल दिला जाईल.

Web Title: Central Government approves Covid-19 test in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.