जात पंचायतीने कुटुंबाला केले वर्षासाठी बहिष्कृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:17 AM2020-12-05T04:17:38+5:302020-12-05T04:17:38+5:30

सासवड : भातू समाजातील न्यायाधीश व्यक्तीला शिवीगाळ केली म्हणून जात पंचायतीने दोन महिलांना व त्यांच्या कुटुंबाला समाजातून १ वर्षासाठी ...

The caste panchayat expelled the family for years | जात पंचायतीने कुटुंबाला केले वर्षासाठी बहिष्कृत

जात पंचायतीने कुटुंबाला केले वर्षासाठी बहिष्कृत

Next

सासवड : भातू समाजातील न्यायाधीश व्यक्तीला शिवीगाळ केली म्हणून जात पंचायतीने दोन महिलांना व त्यांच्या कुटुंबाला समाजातून १ वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा ठराव केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथे घडली. जर समाजात परत यायचे असल्यास त्या मोबदल्यात ५ बोकड, पाच दारूच्या बाटल्या व १ लाख रुपये दंडाची मागणी करण्यात आली. ती न दिल्यास जात पंचयातीने कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सुरेश रत्न बिनवात (रा. सत्वनगर, महंमदवाडी), सप्त पन्नालाल बिनवात (रा. सत्वनगर), नंदू आत्राम रजपूत (रा. वारजे जकात नाक्याजवळ), मुन्ना रमेश कचरावत (रा. वारजे माळवाडी), आनंद रामचंद्र बिनावत (रा. सातवनगर), देवीदास राजू चव्हाण (रा. नऱ्हे गाव), देवानंद राजू कुंभार (रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथील असल्याने हा गुन्हा सासवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

सुहानी ऊर्फ रिटा विकास यांचे वडील मनोज रामचंद्र कुंभार यांचे निधन झाले. सुहानी यांची आई नंदा मनोज कुंभार या धनकवडी येथे एकट्याच राहतात. दोन महिन्यांपासून जात पंचायतीचे पंच सुरेश बिनवात व मुन्ना बिनवात व इतर सुहानी यांच्या मागे त्यांच्या मालमत्तेचा निवाडा करण्याचा आग्रह धरत होते. याला त्यांच्या आई नंदा कुंभार यांनी नकार दिला. यामुळे त्यांना पंचांनी शिवीगाळ केली. ही बाब नंदा यांनी त्याची मुलगी सुहानी हिला सांगितले. यावर सुहानी यांनी समाजाच्या ग्रुपवर मेसेज करीत माझ्या आईला व बहिणीला त्रास देऊ नका, असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देत सुरेश बिनावत यांनी समाजातील १२ गावचे पदाधिकारी, १२ जातीचे सर्व पाहुणे, मित्रमंडळी यांना गेल्या महिन्यात ३ नोव्हेंबरला राजलीला मंगल कार्यालय येथे उपस्थित राहण्यास सांगत रिटा व पूजा या दोघी बहिणींना सर्व समाजासमोर माफी मागण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांनी १ वर्षासाठी बहिष्कृत केले, तसेच त्यांना दंड ठोठावला. तसा व्हिडिओ समाजाच्या ग्रुपवर पाठवला. याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: The caste panchayat expelled the family for years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.