पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यालय उदघाटन कार्यक्रमाप्रकरणी १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 01:53 PM2021-06-20T13:53:33+5:302021-06-20T13:57:24+5:30

पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन न करता कार्यक्रमामध्ये गर्दी केली होती. त्यापैकी काही लोकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते

A case has been registered against 100 to 150 people including city president Prashant Jagtap in connection with the inauguration of NCP office in Pune | पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यालय उदघाटन कार्यक्रमाप्रकरणी १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल

पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यालय उदघाटन कार्यक्रमाप्रकरणी १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सोशल डिस्टसिंगचे पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रामुख्याने शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निलम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे, युवक अध्यक्ष महेश हांडे यांचा समावेश आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. सकाळी लोकांना लॉकडाऊन पुन्हा लावण्याची तंबी दिल्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ खंत व्यक्त केली. यावरुन अजित पवार यांना सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले. याबाबत शनिवारी पोलिसांनी चुप्पी साधली होती. व्हिडिओ आणि फोटो पाहू कारवाई करुन असे सांगण्यात येत होते. मात्र, सोशल मिडियावर होत असलेली टिका टिप्पणीनंतर पोलीस कार्यरत झाले. त्यानंतर रविवारी सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक अध्यक्ष महेश हांडे यांनी कार्यक्रमाकरीता ध्वनीक्षेपणाची परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यात सध्याचे कोविड संसर्गाबाबत शासनाने दिलेल्या अटी व शर्तींचे तंतोतत पालन करुन सामाजिक सुरक्षित अंतर व सर्व जण मास्क लावतील, असे या अर्जात नमूद केले होते. त्यानुसार महेश हांडे यांना योग्य त्या अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली होती. तसेच दक्षता घेण्याबाबत नोटीस बजावली होती. हांडे यांनी कार्यक्रमाला १०० ते १५० जणांच्या उपस्थितीत उद्घाटनाला असतील असे तोंडी कळविले होते. प्रत्यक्षात अंदाजे ४०० ते ५०० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन  न करता कार्यक्रमामध्ये गर्दी केली होती. त्यापैकी काही लोकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते.

नोटीसप्रमाणे व शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे त्यांनी पालन न करता उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कलम १८८, २६९, २७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड १९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश वीर यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: A case has been registered against 100 to 150 people including city president Prashant Jagtap in connection with the inauguration of NCP office in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.