केअर टेकरने लंपास केले साेने ; पाेलिसांनी काही तासांमध्ये केली आराेपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:27 PM2019-08-13T15:27:31+5:302019-08-13T15:28:31+5:30

केअर टेकरने ज्येष्ठ नागरिकांच्या घरातून लंपास केलेले साेने पाेलिसांनी काही तासांमध्ये जप्त करुन त्यांना परत केले.

care taker gold ; police arrested accused in few hrs | केअर टेकरने लंपास केले साेने ; पाेलिसांनी काही तासांमध्ये केली आराेपीला अटक

केअर टेकरने लंपास केले साेने ; पाेलिसांनी काही तासांमध्ये केली आराेपीला अटक

googlenewsNext

पुणे : केअर टेकरने ज्येष्ठ नागरिकांच्या असायतेचा फायदा घेत त्यांच्या कपाटातील 13 ताेळे साने आणि राेकड लंपास केली हाेती. याप्रकरणी दत्तवाडी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली हाेती. पाेलिसांनी आपली चक्रे हलवत काही तासांमध्ये आराेपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चाेरलेले दागिने जप्त केले. त्यांनतर सर्व प्रक्रीया पूर्ण करुन पाेलीसांनी ज्येष्ठ महिलेच्या घरी जात त्यांना ते दागिणे सुपूर्त केले. 

मुग्धा मधुकर साळवी या 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेने दत्तवाडी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली हाेती. साळवी यांचे पती सतत आजीर असल्यामुळे त्यांच्या देखभालासाठी साळवी यांनी एका खाजगी नर्सिंग ब्युराेमधून एका केअरटेकरची नेमणूक केली हाेती. त्या केअरटेकरने ज्येष्ठ नागरिक महिलेच्या  असायतेचा फायदा घेत त्यांच्या घरातील कपाटातील 13 ताेळे साेने आणि राेकड लंपास केली. ज्येष्ठ नागरिक महिलेच्या घरी चाेरी झाल्याने पाेलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्र हलवून आराेपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर लगेचच काेर्टाचे सर्व साेपस्कर पूर्ण करुन ते दागिणे ज्येष्ठ महिलेला सुपूर्त करण्यात आले. याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक शंकर सलगर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवे, कुलदीप संकपाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण,पोलिस हवालदार श्रीकांत शिरोळे, तानाजी निकम, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, प्रमोद भोसले, विशाल साळुंखे उपस्थित होते.

Web Title: care taker gold ; police arrested accused in few hrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.