Vidhan Sabha Election 2019 : पुणे जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:34 AM2019-09-27T11:34:22+5:302019-09-27T11:41:08+5:30

Pune Vidhan Sabha Election 2019 : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी त्याचा फटका विधानसभा निवडणूक प्रक्रियेला बसणार नाही.

Candidates can apply for Vidhan Sabha elections in Pune district from today | Vidhan Sabha Election 2019 : पुणे जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार

Vidhan Sabha Election 2019 : पुणे जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : पुरामुळे निवडणूक कार्यक्रमास कोणतीही बाधा नाही‘जिल्ह्यामधे ७,६६६ मतदान केंद्र असून,  २४९ सहाय्यक मतदान केंद्र जिल्ह्यात ७६ लाख ८६ हजार ६३६ मतदार असून, २४ सप्टेंबर अखेरीस ४६ हजार ५७१ नवीन अर्ज ग्रामीण भागातील मतमोजणी त्या त्या ठिकाणी घेण्याचे नियोजन

पुणे : जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी त्याचा फटका विधानसभानिवडणूक प्रक्रियेला बसणार नाही. शुक्रवारपासून (दि. २६) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.  
निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मृणालिनी सावंत या वेळी उपस्थित होते. ‘जिल्ह्यामधे ७,६६६ मतदान केंद्र असून, २४९ सहाय्यक मतदान केंद्र आहेत. एकूण ७,९१५ मतदान केंद्रामधून मतदान होईल. तात्पुरत्या स्वरुपाच्या २८२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली. अधिकाधिक मतदारसंघ ग्राऊंड फ्लोअरवर करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 
जिल्हाधिकारी राम म्हणाले, निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संबंधितांना खर्चाचा संपूर्ण तपशील द्यावा लागेल. जिल्ह्यात ७६ लाख ८६ हजार ६३६ मतदार असून, २४ सप्टेंबर अखेरीस ४६ हजार ५७१ नवीन अर्ज आले आहेत. त्यातील २८ हजार ९८९ नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली असून, १७ हजार ५८२ अर्जांवर अजून निर्णय झालेला नाही. तर, ३ हजार ३२६ अर्ज नाकारण्यात आले आहेत. मतदारांची अंतिम याची ४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. 
........
ग्रामीण भागातील मतमोजणी त्या त्या ठिकाणी घेण्याचे नियोजन आहे. शहरी भागातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होईल. पुणे शहरातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य गोदामामधे होईल. 
.......

Web Title: Candidates can apply for Vidhan Sabha elections in Pune district from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.