मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरची केबिन जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 10:38 AM2021-01-17T10:38:24+5:302021-01-17T10:38:34+5:30

fire : बोरघाटाची चढण चढून पुण्याच्या दिशेने येणार्‍या एका ट्रेलरच्या केबिनला अचानक आग लागली. यामध्ये प्रसंगावधान राखत चालक केबिनमधून बाहेर पडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Burnt trailer cabin near Amritanjan bridge on Mumbai-Pune expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरची केबिन जळून खाक 

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरची केबिन जळून खाक 

Next

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ पुण्याच्या दिशेने येणार्‍या एका ट्रेलरच्या केबिनला अचानक आग लागल्याने केबिन पुर्णतः जळून खाक झाली. आज सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. 


    मिळालेल्या माहितीनुसार बोरघाटाची चढण चढून पुण्याच्या दिशेने येणार्‍या एका ट्रेलरच्या केबिनला अचानक आग लागली. यामध्ये प्रसंगावधान राखत चालक केबिनमधून बाहेर पडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र ट्रेलरची केबिन पुर्णपणे जळून खाक झाली आहे. आगीची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, बोरघाट महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स व देवदूत यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आग विझवली तसेच इतर वाहनांना धोका होणार नाही याची खबरदारी घेतली. सदर अपघातामुळे वाहतूककोंडीवर फारसा परिणाम झाला नाही.

Web Title: Burnt trailer cabin near Amritanjan bridge on Mumbai-Pune expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.