पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणच्या अँटी चेंबरमध्ये पैशांचे बंडल; अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 06:11 PM2021-11-26T18:11:22+5:302021-11-26T18:16:24+5:30

समाजकल्याण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. हे पैसे नाकारत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला.

bundle of money in pune zilla parishad social welfare anti chamber attempt to bribe an officer | पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणच्या अँटी चेंबरमध्ये पैशांचे बंडल; अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न

पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणच्या अँटी चेंबरमध्ये पैशांचे बंडल; अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न

Next

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याणच्या अँटी चेंबरमध्ये अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारण्यास नकार देत तेथून पळ काढतानाचा प्रकार समोर आला आहे. अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांच्याकडे कामे मंजूर करून घेण्यासाठी शिरूर तालुक्यातील येथील एक व्यक्तीने आले होते. त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. हे पैसे नाकारत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला. 

पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीने अँटी चेंबरमध्ये जात पैशाचे बंडल ठेवले. दरम्यान, कोरंगटीवार  यांनी संशयित वाटल्याने बाहेर निघून गेले. दरम्यान, ही समाजकल्याण अधिकाऱ्याच्या कार्यालयात पैशाचा पाऊस अशी चर्चा सुरू झाली. 

याविषयी कोरंटीवार म्हणाले, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती आले, त्यांनी कामे मंजूर करून घ्या, तुमचं काही असेल तर दिलं जाईल, असे सांगितले. परंतु कोणताही काम करण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. नियमानुसार काम केलं जाईल, असे सांगितले. दलित वस्ती चे काम मंजूर करून घेण्यासाठी एक व्यक्ती सकाळी माझ्या कार्यालयमध्ये आला. त्यांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला. आपण तुझे काम करून देतो तुम्ही जावा असा सल्ला मी त्यांना दिला. मात्र त्या व्यक्तीने माझ्या कार्यालयात नोटा फेकल्या. नोटा घेऊन आलेल्या व्यक्तीवर आता काय कारवाई होणार याकडे संपूर्ण प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Web Title: bundle of money in pune zilla parishad social welfare anti chamber attempt to bribe an officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.