बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:14+5:302021-06-25T04:10:14+5:30

पुणे : मुंबई पोलिसांनी पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी पुण्यातून गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांना मुंबई ...

Builder Paranjape brothers arrested by police in fraud case | बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

googlenewsNext

पुणे : मुंबई पोलिसांनी पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी पुण्यातून गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांना मुंबई येथे नेण्यात आले आहे.

श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे (वय ६३) आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय ५९) अशी या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहे. याप्रकरणी वसुंधरा डोंगरे यांनी विलेपार्ले पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४७६, ४६७, ४६८, ४२० व १२० (ब) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या परांजपे यांच्या कुटुंबीयांशी संबंधित आहेत. परांजपे यांच्या काही जागा या मुंबईतील विलेपार्ले परिसरात आहेत. ती जागा विकण्यात आली आहे. फिर्यादी या वारस असताना त्यांना काहीही न सांगता, त्यांना कळू न देता ही जागा विकण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. बनावट दस्त बनवून तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तातडीने पुण्यात आले. परांजपे बंधुंना सायंकाळी डेक्कन परिसरातील राहत्या घरातून ताब्यात घेतले. डेक्कन पोलिसांना याबाबत माहिती देऊन हे पथक मुंबईला रवाना झाले. लागोपाठ दोन बांधकाम व्यावसायिकांना फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आल्याने पुण्यातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Web Title: Builder Paranjape brothers arrested by police in fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.