धाडसी मेंढपाळाने बिबट्यावरच प्रतिहल्ला करत वाचवला मुक्या प्राण्याचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 07:14 PM2020-01-20T19:14:33+5:302020-01-20T19:22:31+5:30

जखमी मेंढीला सोडुन बिबट्याने काढला पळ

The brave shepherd rescues the ship's life from leopard attack | धाडसी मेंढपाळाने बिबट्यावरच प्रतिहल्ला करत वाचवला मुक्या प्राण्याचा जीव 

धाडसी मेंढपाळाने बिबट्यावरच प्रतिहल्ला करत वाचवला मुक्या प्राण्याचा जीव 

Next

बारामती : बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे बिबट्याने सोमवारी(दि २०) सायंकाळी कळपातील मेंढीवर  हल्ला केला. यावेळी कळपातील मेंढी बिबट्याने फरपटत नेली.मात्र, धाडसी मेंढपाळाने बिबट्यावर काठीने प्रतिहल्ला केला.त्यामुळे जखमी मेंढीला सोडुन बिबट्याने पळ काढला. या प्रकरणाची दखल वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश मंत्री भरणे यांनी वनविभागाला दिले.महादेव मारुती काळे असे या धाडसी मेंढपाळाचे नाव आहे. आज सायंकाळीकाटेवाडी —कन्हेरी रस्त्यावर धनेवस्ती येथे काळे यांच्या मेंढ्याचा कळपचरत होता. यावेळी ४.३० च्या सुमारास बिबट्याने अचानक कळपातील मेंढीमानेला जबड्यात धरुन फरपटत नेली. यावेळी मेंढ्या चराईसाठी येथे
थांबलेल्या काळे यांनी हा प्रकार पाहुन धाडसीपणाने बिबट्याचा पाठलाग केला.तोपर्यंत बिबट्याने तीन चार एकर क्षेत्रातुन मेंढी फरपटतोली.मात्र, काळे यांनी त्याचा पाठलाग सुरु ठेवत त्याच्यावर काठीने हल्लाकेला.त्यामुळे बिबट्याने मेंढीला सोडत ऊसक्षेत्रामध्ये पळ काढला.काळेयांनी मोठ्या धाडसाने मेंढीचा जीव वाचवला आहे.  या घटनेमुळे परीसरात
दहशतीचे वातावरण आहे. येथील स्थानिक शेतकरी भाऊसाहेब काटे यांनीह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले की, आज सायंकाळी अचानक बिबट्याने हल्ला केला.
आमच्या परीसरात सर्व शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शेतकरी शेतीलापाणी द्यायला सुध्दा घराबाहेर पडायला तयार नाहित.शेतकºयांसह दुभत्याजनांवरदेखील बिबट्याच्या हल्लयाच्या भीतीचे सावट आहे.अवघ्या तीन दिवसांपुर्वी  बिबट्याने परीसरात शुक्रवारी (दि १७) रात्रीकुत्र्याचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परीसरात दहशतीचे वातावरण पसरलेआहे.वनखात्याने या भागात तातडीने रात्रीची गस्त सुरु केली आहे. या भागातवनखाते ह्यट्रॅप कॅ मेरेह्ण  लावणार आहे.बारामती कटफळ परिसरातील एमआयडीसीतील बाऊली इंडिया  बेक्स अँड स्वीटस प्रा.ली. कंपनीच्या  आवारात  ९ डीसेंबर२०१९ रोजी बिबट्याचा   वावर कंपनीच्या सीसीटीव्ही मध्ये कै द झालाहोता.हा बिबट्या अद्याप बारामती तालुक्यातच वावरत आहे. आजपर्यंत याबिबट्याला प्रत्यक्ष कोणीही पाहिले नव्हते.मात्र, आज मेंढीवरील हल्लाझाल्यानंतर त्याच्या हल्लयाला प्रत्यक्ष मेंढपाळानेच तोंड दिले.त्यामुळेतो बिबट्याच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना हि घटनागांभीयार्ने घेत याप्रकरणी आवश्यक उपाययोजना करण्याचे वनविभागाला आदेशदिल्याचे सांगितले. शेतकºयांनी घाबरुन जावु नये,असे आवाहन भरणे यांनीकेले आहे.

Web Title: The brave shepherd rescues the ship's life from leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.