साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याने गमावले दोन्ही हात आणि पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 08:00 PM2019-05-21T20:00:52+5:302019-05-21T20:02:46+5:30

घराच्या छतावर खेळताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने साडेतीन वर्षां गंभीर जखमी झाला होता..

Both hands and feet are lost of three and a half years | साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याने गमावले दोन्ही हात आणि पाय

साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याने गमावले दोन्ही हात आणि पाय

ठळक मुद्देमहावितरणचे अधिकारी तसेच घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : कात्रज येथील सच्चाईमातानगर भागात भाड्याने राहणाऱ्या आजीच्या घरी आल्यानंतर घराच्या छतावर खेळताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झालेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून दुर्घटनेला जबाबदार असल्याप्रकरणी महावितरणचे अधिकारी तसेच घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला. 
आदी गणेश गायकवाड (वय ३.५ वर्षे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याचे वडील गणेश अनंता गायकवाड (वय २९, सध्या रा. आंबेडकर चौक, बोपोडी-औंध रस्ता, मूळ रा कोंढवळे, वेल्हा) यांनी यासंदर्भात भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,घरमालक मनोज सोडमिसे तसेच महावितरणचे अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश टेलरिंग काम करतात. त्यांचे काका कात्रज येथील सच्चाईमातानगर भागात भाड्याने राहतात. १८ एप्रिल रोजी गणेश यांची पत्नी आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा आदी त्यांच्याकडे सच्चाईमाता नगर परिसरात आले होते. तेव्हा तो सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गच्चीवर खेळत होता. त्यावेळी गच्चीवरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीला त्याचा स्पर्श झाला. त्यावेळी तो या घटनेत गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयता दाखल करण्यात आले. त्यात त्याच्या हात आणि पायांच्या स्नायूंना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याला दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले आहेत.
गणेश यांचे काका मनोज सोडमिसे याच्या घरी सच्चाईमाता नगर येथे राहतात. सोडमिसे याने सच्चसाईमाता नगर येथे महावितरणच्या मोठ्या आकारच्या रोहित्राजवळ दुमजली घर बांधले आहे. इमारत आणि रोहित्र यांच्यात केवळ एक फुटांचे अंतर आहे. तर तेथूनच महावितरणची उच्च दाबाची वाहिनी पुढे गेली आहे. सोडमिसे यांच्या घरावरून ही वीजवाहिनी गेलेली असून चार ते पाच फुट उंचीवर त्या वाहिनी आहेत. त्या दिवशी आदी खेळत होता.
त्यावेळी त्याच्या हातात सळई होती. तिचा या वाहिनीला स्पर्श झाल्याने हा अपघात झाला. दरम्यान याप्रकरणी त्याच्या वडीलांनी दिलेल्या फियार्दीनुसार पोलिसांनी तपास केला. तेव्हा घरमालक आणि महावितरणच्या अधिकाºयांमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले. त्यानंतर याप्रक?णी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. केसकर करत आहेत.

Web Title: Both hands and feet are lost of three and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.