कोरोनाच्या संकटातही 'बळीराजाची सुपर कामगिरी' ; गतवर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या क्षेत्रात दहा पटीने भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 06:43 AM2020-07-25T06:43:28+5:302020-07-25T06:45:01+5:30

कोरोना संकटाचे ढग संपूर्ण देशावर गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे...

The boom in the agricultural sector even in the Corona crisis; Ten percent increase in kharif crop area as compared to last year | कोरोनाच्या संकटातही 'बळीराजाची सुपर कामगिरी' ; गतवर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या क्षेत्रात दहा पटीने भरारी

कोरोनाच्या संकटातही 'बळीराजाची सुपर कामगिरी' ; गतवर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या क्षेत्रात दहा पटीने भरारी

googlenewsNext
ठळक मुद्देतुर, मूग, उडीद, बाजरी व सोयाबीनची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड 

सुषमा नेहरकर -शिंदे
पुणे : संपूर्ण देशावर कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे. कोरोनामुळे सर्व क्षेत्रातील लोकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली असतानाच, एकट्या पुणे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या क्षेत्रात सरासरी तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत सरासरी 12 हजार 239 हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा यामध्ये मोठी वाढ होऊन तब्बल 2 लाख 30 हजार 468 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. 

संपूर्ण जुलै महिना पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील भाताची पुर्नलागवड लांबणीवर पडल्या असून, भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु जुन महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात प्रथमच बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. 

यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्र संकटा सापडले असले तरी कृषी क्षेत्राने शेतक-यांना चांगला आधार दिला आहे. त्यात यंदा जुन महिन्यांत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने आता पर्यंत सरासरीच्या 125 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गत वर्षी आता पर्यंत 12 हजार 239 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. जिल्ह्यात सुमारे 1लाख 84 हजार 274 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या होतात. यामध्ये जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यात खरीपाचे क्षेत्र अधिक आहे. तर दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर हे तालुके रब्बीचे तालुके म्हणून ओळखले जातात. परंतु जुन महिन्या चक्रीवादळात संपूर्ण जिल्ह्यातच चांगला पाऊस झाला. यामुळे यंदा अनेक वर्षांनंतर रब्बीच्या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बाजरी, तूर, मूग उडीद आणि सोयाबीनची लागवड झाली आहे. यामुळेच जिल्ह्याच्या खरीपाच्या लागवडी क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. 
---- 
पावसाने ओढ दिल्याने भाताची पुनर्लागवड लांबणीवर 
पुणे जिल्ह्यात भाताचे सरासरी लागवड क्षेत्र 57 हजार 964 हेक्टर ऐवढे आहे . त्यापैकी आता पर्यंत केवळ 20 हजार 743 हेक्टर क्षेत्रावरच भाताची पुर्नलागवड झाली आहे. संपूर्ण जुलै महिन्या पावसाने ओढ दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस आणखी लांबल्यास भात उत्पादक शेतक-यासह सर्वच शेतकरी अडचणीत सापडतील.
----
जिल्ह्यात प्रमुख खरीप पिकांची लागवडची माहिती 
पिकाच नाव                सरासरी क्षेत्र          प्रत्यक्ष पेरणी       टक्के
भात                            57964                    20743              36
बाजरी                         38761                    52614               136
तूर                              1920                       9011                469
मूग                           13804                     14838              107
उडीद                        1557                         2479                159 
भुईमूग                    16090                       14886               93 
सोयाबीन                17472                        19932                 114

Web Title: The boom in the agricultural sector even in the Corona crisis; Ten percent increase in kharif crop area as compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.