पुण्यात गणपती विसर्जना दरम्यान नदीपात्रात बोट उलटली; तिघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 07:10 PM2019-09-12T19:10:00+5:302019-09-12T19:11:47+5:30

गणेश विसर्जनासाठी बोटीने नदीपात्रात गेले असताना बोट उलटल्याने तिघे जण पाण्यात पडले होते़.

boat accident during Ganapati immersion in the pune ; 3 person saved | पुण्यात गणपती विसर्जना दरम्यान नदीपात्रात बोट उलटली; तिघांना वाचविण्यात यश

पुण्यात गणपती विसर्जना दरम्यान नदीपात्रात बोट उलटली; तिघांना वाचविण्यात यश

Next

पुणे :गणेश विसर्जनासाठी बोटीने नदीपात्रात गेले असताना बोट उलटल्याने तिघे जण पाण्यात पडले होते़. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघा पुरुषांना वाचविले़. ही घटना काँग्रेस भवनसमोरील अमृतेश्वर विसर्जन घाटावर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली़. 
पाण्यात गेलेली बोट उलटल्याचे पाहून अग्निशमन दलाचे जवान विनोद सरोदे व जीवरक्षकांनी बोटीतील तिघांना बाहेर काढले़. बुधवारी संगम घाटावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी वाचविले होते़. गेल्या तीन दिवसात ६ जणांचा प्राण वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे़. आज गणपती विसर्जना दरम्यान वृदेश्वर घाटाजवळ एक युवक बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे व जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर, चौगुले यांनी बुडणाऱ्या युवकास वाचविले.

औंध विसर्जन घाटावर  विसर्जना दरम्यान पाय घसरल्याने 14 वर्षीय मुलगी पाण्यात बुडाली असताना प्रभारी अग्निशमन अधिकारी कमलेश सनगाळे तर तिथेच एका 54 वर्षीय इसमाला बुडताना चंद्रकांत बुरुड यांनी वाचविले.

Web Title: boat accident during Ganapati immersion in the pune ; 3 person saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.