भाजप नगरसेवकाचं महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन फक्त 'चमकोगिरी'साठीच; राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:33 PM2021-04-30T17:33:20+5:302021-04-30T17:52:47+5:30

कोविड उद्रेक झालेला असताना अधिकारी आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता चोवीस तास सेवा बजावत आहेत. या कोणत्याही गोष्टींची किंमत भाजपा नगरसेवकांना नाही....

BJP corporator's mistreatment of women officers only for publicity; Criticism of NCP's Rupali Chakankar | भाजप नगरसेवकाचं महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन फक्त 'चमकोगिरी'साठीच; राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची टीका 

भाजप नगरसेवकाचं महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन फक्त 'चमकोगिरी'साठीच; राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची टीका 

Next
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांना दिले निवेदन 

धायरी: कोरोना संकटात सर्व अधिकारी व कर्मचारी जीवाची पर्वा न करता चोवीस तास कर्तव्य बजावत आहेत.मात्र याची किंमत भाजपा नगरसेवकांना नसून त्यांचे महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन हे फक्त चमकोगिरी करण्यासाठी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसमहिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

चाकणकर म्हणाल्या, पुणे महापालिकेत महिला कर्मचाऱ्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यासंदर्भात कोणतीही आचारसंहिता आणि नियमावली महापालिकेने तयार केली नसून महिला कर्मचाऱ्यांना कुचंबनेला आणि अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत आहे.वानवडी येथील प्रभाग क्रमांक २५ येथे लसीकरण केंद्र चालू करण्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी मनपा आरोग्य अधिकारी डाॅ.वैशाली जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केलेले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त संबंधित नगरसेवकावर कडक कारवाई करण्याबाबत निवेदन दिले असून महानगरपालिकेत महिला सुरक्षासंदर्भात नियमावली असावी,त्याचे पालन काटेकोरपणे व्हावे अशी मागणीही यावेळी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

यावेळी विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके,महिला शहराध्यक्ष मृणालिणी वाणी,सुहास चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर उपस्थित होते.

काय आहे प्रकरण ...
प्रभागात नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या दालनात मागणी लावून धरली होती. यावेळी आरोग्य विभागातील लसीकरण अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनाही घोगरे यांनी तुम्ही काय काम करता,रात्री फोन केला तर उचलला नाही, दोन दिवस झाले फाईल पाठवून तुम्ही काय झोपा काढता का, असे म्हणत डॉ. जाधव यांच्या अंगावर धावून गेले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, यामध्ये तू तू मैं मैं सुरू झाली. अखेर डॉ. जाधव यांना अन्य सहकारी डॉक्टरांनी तर नगरसेवक घोगरे यांना इतर सदस्यांनी मध्यस्थी करून अडविले.

Web Title: BJP corporator's mistreatment of women officers only for publicity; Criticism of NCP's Rupali Chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.