शहरात अनेक ठिकाणी उभे अाहेत मृत्युचे सापळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 08:15 PM2018-10-06T20:15:16+5:302018-10-06T20:17:26+5:30

शहरात अनेक माेठ-माेठाले अनधिकृत हाेर्डिंग चाैका-चाैकात असून ते एकप्रकारे मृत्युचे सापळे बनले अाहेत.

big hoardings of city are like life trap | शहरात अनेक ठिकाणी उभे अाहेत मृत्युचे सापळे

शहरात अनेक ठिकाणी उभे अाहेत मृत्युचे सापळे

Next

पुणे : जुन्या बाजाराजवळील चाैकात हाेर्डिंग पडून चार जणांना जीव गमवावा लागला. चाळीस बाय चाळीस फुट एवढ्या माेठ्या अाकाराचे ते हाेर्डिंग हाेते. महापालिकेच्या म्हणण्यानुसार चाळीस बाय वीस फुट इतक्या अाकाराच्या हाेर्डिंगला परवानगी अाहे. परंतु शहरात अनेक माेठ-माेठाले अनधिकृत हाेर्डिंग चाैका-चाैकात असून ते एकप्रकारे मृत्युचे सापळे बनले अाहेत. 

    गुरुवारी शाहीर अमर शेख चाैकामध्ये दुपारी 1.30 च्या सुमारास रेल्वेच्या हद्दीतील चाळीस बाय चाळीस फुट अाकाराचे अनधिकृत हाेर्डिंग काढण्याचे काम सुरु असताना ते सिग्नलला उभ्या असणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर काेसळून चार जणांचा त्यात मृत्यू झाला. या भागात दाेन हाेर्डिग रेल्वेच्या मालकीची हाेती. यातील एक धाेकादायक हाेर्डिंग पाडण्याचे काम रेल्वेने ठेकेदाराला दिले हाेते. हाेर्डिंग काढण्याची कल्पना महापालिका प्रशासन तसेच पाेलिसांना देण्यात अाली नव्हती. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील माेठ-माेठाल्या हाेर्डिंगमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. महापालिकेच्या अाकाशचिन्ह विभागाच्या अाकडेवारीनुसार शहरात 1886 अधिकृत हाेर्डिंग असून 114 अनधिकृत हाेर्डिंग अाहेत. अनेक हाेर्डिंगचे परवाने संपलेले असतानाही त्यावर जाहीराती झळकत अाहेत. तर अनेकांचे सांगाडे वर्षानुवर्षे तेच असल्याने जीर्ण झाल्याची शक्यता अाहे. 

    गुरुवारी अपघात घडला त्या ठिकाणापासून काही अंतरावरच अजस्त्र असे हाेर्डिंग अाहेत. शहरातील काही भागांमध्ये तर इमारतीच्या वरती हाेर्डिंग उभारण्यात अाले अाहेत. एखादा अपघात घडल्यास माेठी जीवीत हानी हाेऊ शकते. संचेती चाैक, नळस्टाॅप, अारटीअाे चाैक अशा ठिकाणी माेठ्या उंचीचे हाेर्डिंग अाहेत. महापालिकेकडून सर्व हाेर्डिंगचे स्ट्रक्चरल अाॅडिट करण्यात येणार असले तरी अनधिकृत हाेर्डिंगवर कधी कारवाई हाेणार असा प्रश्न विचारला जात अाहे.  

Web Title: big hoardings of city are like life trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.