भोई प्रतिष्ठानचे मदत पथक पूरगस्त भागात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:21+5:302021-07-25T04:11:21+5:30

या परिसरातील मीर गाव अणि पंचक्रोशीत दरड कोसळून अनेक बांधव मृत्युमुखी पडले असून, अनेक ...

Bhoi Pratishthan's relief team will go to the flood affected areas | भोई प्रतिष्ठानचे मदत पथक पूरगस्त भागात जाणार

भोई प्रतिष्ठानचे मदत पथक पूरगस्त भागात जाणार

Next

या परिसरातील मीर गाव अणि पंचक्रोशीत दरड कोसळून अनेक बांधव मृत्युमुखी पडले असून, अनेक जण बेपत्ता आहेत. वाचलेल्या बांधवांना कोयनानगर येथील शाळेत तात्पुरत्या निवासात ठेवले आहे. अचानक आलेल्या या संकटाचा सामना करताना येथील बांधवांना भावनिक, मानसिक आधार देण्यासाठी तसेच त्यांना वैद्यकीय आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानमार्फतचे वैद्यकीय मदत पथक मंगळवार २७ जुलै रोजी कोयनानगरला जाणार आहे. स्थानिक प्रशासन आणि NDRF टीम यांच्या समन्वयातून हे पथक कार्यरत राहणार असून, या आपत्तीग्रस्त बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी पुणेकरांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, असे आवाहन या टीमचे प्रमुख आणि भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी केले आहे.

Web Title: Bhoi Pratishthan's relief team will go to the flood affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.