पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात पोलिसांची वेश्या व्यवसायावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:44 PM2021-11-26T17:44:44+5:302021-11-26T17:58:35+5:30

दोन पंचांना सोबत घेत व एक बोगस ग्राहक तयार करत त्याच्याकडे पैसे देण्यात आले. त्याने दलाल महिलेला भेटल्यानंतर तिने एक महिला दाखवली...

baramati police second time raid prostitution caught in city | पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात पोलिसांची वेश्या व्यवसायावर कारवाई

पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात पोलिसांची वेश्या व्यवसायावर कारवाई

googlenewsNext

बारामती: शहर पोलिसांनी सलग दुसऱ्या आठवड्यात वेश्या व्यवसायावर कारवाई करत दलाल महिलेला अटक केली आहे. शहर पोलिसांनी वेश्या व्यवसायाच्या कारवाईवर सातत्य ठेवत या व्यवसायाची पाळेमुळे खणण्यास सुरवात केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिस हवालदार अमृता भोईटे यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलीसांनी मागील आठवड्यात केलेल्या कारवाईमध्ये वेश्या व्यवसाय करत असलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात शहरातील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयासमोरील चिमनशहा मळा परिसरातील एका लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय उघड करण्यात पोलीसांना यश आले आहे.

गुरुवारी (दि. २५) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास झालेल्या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्यासह पोलिस कर्मचारी पवार, राऊत, हिंगणे, लाळगे आदींनी या कारवाईत भाग घेतला. चिमनशहा मळा परिसरात दोन महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती महाडिक यांना मिळाली होती. त्यानुसार बोगस ग्राहक पाठवून शहानिशा करण्याचे आदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. दोन पंचांना सोबत घेत व एक बोगस ग्राहक तयार करत त्याच्याकडे पैसे देण्यात आले. त्याने दलाल महिलेला भेटल्यानंतर तिने एक महिला दाखवली. दीड हजार रुपये स्विकारत त्या महिलेसोबत बोगस ग्राहक गेल्यानंतर त्याने पोलिस निरीक्षक महाडीक यांना मोबाईलवर मिस्ड कॉल देत इशारा केला.

बाजूला साध्या वेषात थांबलेल्या पोलिस पथकाने तेथील एका लॉजवर छापा टाकत दोघा महिलांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी सध्या रुई येथे वास्तव्यास असणाऱ्या (मुळ—माळशिरस,जि. सोलापूर)  २२ वर्षीय महिलेची सुटका केली. या प्रकरणी शहरातील रुई परिसरातील बयाजीनगर येथे राहणाऱ्या दलाल महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे.

...अन्यथा लॉजवर कायदेशीर कारवाई
वेश्या व्यवसास सुरु असताना एजंट लॉजबाहेर थांबतात.त्यानंतर ग्राहकाला घेवुन लॉजमध्ये जातात.त्यामुळे शहरातील लॉजमालकांनी काळजी घ्यावी.अन्यथा लॉजवर कायदेशीर कारवाई करण्याचा  इशारा पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिला आहे.

Web Title: baramati police second time raid prostitution caught in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.