बारामती पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ : २५ पेक्षा जास्त नागरीकांना चावा  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 07:20 PM2019-12-13T19:20:33+5:302019-12-13T19:31:58+5:30

बारामती शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकुळ सुरुच आहे.आज शहरातील कसबा भागात पिसाळलेल्या कुत्र्याने २५ पेक्षा जास्त नागरीकांना चावा घेतला.

Baramati dog bites for more than 25 citizens | बारामती पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ : २५ पेक्षा जास्त नागरीकांना चावा  

बारामती पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ : २५ पेक्षा जास्त नागरीकांना चावा  

Next

पुणे (बारामती) : बारामती शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकुळ सुरुच आहे.आज शहरातील कसबा भागात पिसाळलेल्या कुत्र्याने २५ पेक्षा जास्त नागरीकांना चावा घेतला. आज शुक्रवारी (दि १३) दुपारपासुन एक तास काळ्या रंगाच्या एकाच कुत्र्याने अनेकांना चावा घेवून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.उपचार घेण्यासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.यापुर्वी नोव्हेंबर मध्ये देखील अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता.
शहरात मोठ्या प्रमाणावर  भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. नगरपालिका प्रशासन याबाबत उदासीन असुन भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरले आहे. ५ नोव्हेंबर नंतर अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत पुन्हा पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घातला आहे.  ५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या पहिला दिवस पिसाळलेल्या कुत्र्यांनी विद्यार्थी,नागरीकांना चावा घेतला होता. त्यावेळी  पिसाळलेल्या कुत्र्यांनी वयस्कर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसह  अनेकांचा चावा घेतला होता.यावेळी चावा घेतलेल्या दिपाली जाधव या  विवाहितेचा २० दिवसांपुर्वी मृत्यु झाला आहे.

आज शुक्रवारी पुन्हा कसबा,विठ्ठल प्लाझा,झारी गल्ली,मारवाड पेठ, भाजी मंडई, मळद पुल,लक्ष्मीनारायणनगर भागात  पिसाळलेल्या काळ्या रंगाच्या कुत्र्याने नागरीकांना चावा घेतला. महेश नारंग हे दुचाकीवर जात असतान ‘त्या ’कुत्र्याने झेप घेवुन त्यांच्या पायाला चावा घेतला. बारामती शहरात अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शहरातील नागरिकांनी बारामती नगर पालिकेकडे तक्रारी देखील केल्या आहेत. शहरातील अनेक भागत चौकात ही भटकी कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. याबाबत बारामतीकरांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरीषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहिम देखील हाती घेतल्याचे सांगण्यात आले होते.मात्र, आज घडलेल्या घटनेने नगरपरीषदेची मोहिम अयशस्वी ठरल्याची चर्चा वाढली आहे.
 या पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे चाळीसजणांना नागरिकांना क्रुर पणे चावा घेतला आहे.दिवसा ढवळ्या  पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपचारासाठी सिल्व्हर जुबाली हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. बारामती नगरपरीषदेचे गटनेते सचिन सातव यांनी तातडीने भेट देत नागरीकांची विचारपुस केली.तसेच तातडीने उपचार करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सुचना दिल्या.
नबीलाला शेख,चेतन जगताप,सुमीत रणशिंग,महेश नारंग,शकुर बागवान,चैतन्य पवार,इब्राहिम, मुस्तकीम कुरेशी,जावेद कुरेशी,संदीप अडागळे,इकबाल तांबोळी,विशाल यादव, अजय माने, अमोल शिंदे,बाळु मोरे, दिनेश  पवार, शेख शमशुद्दीन,श्रीकांत भोसले आदी नागरीकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.

बारामती पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकुळ : २५ पेक्षा जास्त नागरीकांना चावा  
पुणे (बारामती) :
बारामती शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकुळ सुरुच आहे.आज शहरातील कसबा भागात पिसाळलेल्या कुत्र्याने २५ पेक्षा जास्त नागरीकांना  चावा घेतला. आज शुक्रवारी (दि १३) दुपारपासुन एक तास काळ्या रंगाच्या एकाच कुत्र्याने अनेकांना चावा घेवून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.उपचार घेण्यासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.यापुर्वी नोव्हेंबर मध्ये देखील अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता.
शहरता मोठ्या प्रमाणावर  भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. नगरपालीका प्रशासन याबाबत उदासीन असुन भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरले आहे. ५ नोव्हेंबर नंतर अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत पुन्हा पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घातला आहे.  ५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या पहिला दिवस पिसाळलेल्या कुत्र्यांनी विद्यार्थी,नागरीकांना चावा घेतला होता. त्यावेळी   पिसाळलेल्या कुत्र्यांनी वयस्कर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसह  अनेकांचा चावा घेतला होता.यावेळी चावा घेतलेल्या दिपाली जाधव या  विवाहितेचा २० दिवसांपुर्वी मृत्यु झाला आहे. आज शुक्रवारी  पुन्हा कसबा,विठ्ठल प्लाझा,झारी गल्ली,मारवाड पेठ, भाजी मंडई, मळद पुल,लक्ष्मीनारायणनगर भागात  पिसाळलेल्या काळ्या रंगाच्या कुत्र्याने नागरीकांना चावा घेतला. महेश नारंग हे दुचाकीवर जात असतान ‘त्या ’कुत्र्याने झेप घेवुन त्यांच्या पायाला चावा घेतला.
बारामती शहरात अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शहरातील नागरिकांनी बारामती नगर पालिकेकडे तक्रारी देखील केल्या आहेत. शहरातील अनेक भागत चौकात ही भटकी कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. याबाबत बारामतीकरांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरीषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहिम देखील हाती घेतल्याचे सांगण्यात आले होते.मात्र, आज घडलेल्या घटनेने नगरपरीषदेची मोहिम अयशस्वी ठरल्याची चर्चा वाढली आहे.
 या पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे चाळीसजणांना नागरिकांना क्रुर पणे चावा घेतला आहे.दिवसा ढवळ्या  पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपचारासाठी सिल्व्हर जुबाली हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. बारामती नगरपरीषदेचे गटनेते सचिन सातव यांनी तातडीने भेट देत नागरीकांची विचारपुस केली.तसेच तातडीने उपचार करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सुचना दिल्या.
नबीलाला शेख,चेतन जगताप,सुमीत रणशिंग,महेश नारंग,शकुर बागवान,चैतन्य पवार,इब्राहिम, मुस्तकीम कुरेशी,जावेद कुरेशी,संदीप अडागळे,इकबाल तांबोळी,विशाल यादव, अजय माने, अमोल शिंदे,बाळु मोरे, दिनेश  पवार, शेख शमशुद्दीन,श्रीकांत भोसले आदी नागरीकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.


बारामतीत बिबट्याचीही दहशत
बारामती एमआयडीसीमध्ये रविवारी(दि ८) बिबट्याचा वावर आढळुन आला आहे.त्यामुळे बिबट्याची दहशत कायम  असताना पुन्हा पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घातला आहे. शहरात विविध भागागत  बिबट्या दिसल्याची अफवा दररोज पसरत आहे. त्यामुळे बारामतीकर दहशतीच्या छायेत वावरत आहेत. राजकारणात बारामतीची दहशत असल्याचे मानले जाते.मात्र, शहरातील  नागरीकांना मात्र, बिबट्यासह पिसाळलेल्या कुत्र्याने दहशतीत ठेवले आहे.

 योग्य उपचार घेणे अत्यंत गरजेचे
सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ निर्मलकुमार वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आज साधारण २५ जणांना कुत्र्याने चावा घेतला.त्यासाठी आवश्यक प्रतिबंधक लस आपल्याकडे उपलब्ध आहे.मात्र, कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णाने योग्य उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच नियोजित डोस घेण्याची दक्षता घ्यावी,असे आवाहन डॉ वाघमारे यांनी केले आहे.

Web Title: Baramati dog bites for more than 25 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.