गणपती बाप्पा मोरया! प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वराला आंब्यांची आकर्षक सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:21 PM2021-05-17T16:21:38+5:302021-05-17T16:35:28+5:30

अक्षय्य तृतीयानिमित्त बाप्पाला नैवेद्य

Bappa Moraya! Decoration of 360 mangoes at Mayureshwar, Morgaon | गणपती बाप्पा मोरया! प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वराला आंब्यांची आकर्षक सजावट

गणपती बाप्पा मोरया! प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वराला आंब्यांची आकर्षक सजावट

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे मनपाच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी दिले ३० डझन आंबे

मोरगाव: अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव येथील मयुरेश्वरास आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट करण्यात आली होती. पुणे मनपाच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी श्रींच्या नैवद्यासाठी आंबे दिले होते. दुपारी ३ वाजता पुजेनंतर आंब्याची सुंदर आरास तयार करण्यात आली.

राज्यातील सर्व धार्मिक स्थळ कोरोना या विषाणूजन्य आजाराचा वाढता फैलाव लक्षात घेता बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील मयुरेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मात्र पूजा आणि धार्मिक विधी संपन्न होत आहेत.

अक्षय्य तृतीया निमित्ताने पुणे येथील आश्विनी कदम यांनी श्रींच्या नैवेद्य म्हणून आंब्याची आरास करण्यासाठी ३० डझन आंबे दिले होते. तृतीयाच्या निमित्ताने दुपारी ३ वाजता पूजा करण्यात आली.  पुजारी संजय धारक, धनंजय धारक, अंकुश गुरव, गजानन धारक यांनी श्रींची पूजा करुन आंब्यांची सुंदर सजावट केली होती. दुसऱ्या दिवशी मोरगाव येथील कोरोना विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांना हे आंबे देण्यात आले.

Web Title: Bappa Moraya! Decoration of 360 mangoes at Mayureshwar, Morgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.