राज्य सरकारकडून पुणे शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न: आम्ही न्यायालयात दाद मागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 11:58 AM2021-05-07T11:58:04+5:302021-05-07T12:03:25+5:30

हा महापालिका व शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न.. महापौरांचा आरोप..

This is an attempt by the state government to dirty image of Pune city: we will going to court: Mayor Murlidhar Mohol | राज्य सरकारकडून पुणे शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न: आम्ही न्यायालयात दाद मागणार

राज्य सरकारकडून पुणे शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न: आम्ही न्यायालयात दाद मागणार

googlenewsNext

पुणे:राज्य सरकारने पुणे शहरासंदर्भात कोरोना रूग्णांची चुकीची आकडेवारी जाहीर केली. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. हा महापालिकेची, पर्यायाने शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रकार आहे असा आरोप महापौरांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉलमध्ये होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीपुर्वी महापौर मोहोळ यांनी राज्य सरकारवर हा गंभीर आरोप केला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे त्यांच्यासमवेत होते. कोरोना निर्मूलन कामात पुणे शहराने देशात गौरव व्हावा असे आदर्श काम केले. सरकारने त्याची दखल घेतली नाही. उलट न्यायालयात पुणे शहरात १ लाख रूग्ण आहेत असे सांगितले. ही आकडेवारी जिल्ह्याची आहे. फक्त पुणे शहराची नाही हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळेच न्यायालयाने कडक लॉकडाऊन करण्याविषयी सांगितले असा दावा मोहोळ यांनी केला. 

न्यायालयात तर याची दाद मागूच, पण सरकारने त्वरीत खुलासा करावा अशी आमची मागणी आहे. ती मान्य करावी, अन्यथा चुकीच्या आकडेवारीवरुन लादल्या जाणाऱ्या  कोणत्याही कडक निर्बंधाचा आम्ही विरोध करणार आहोत, असे मोहोळ म्हणाले.

Read in English

Web Title: This is an attempt by the state government to dirty image of Pune city: we will going to court: Mayor Murlidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.