गोपनीय अहवाल व्हायरल केल्याबद्दल सहायक निरीक्षक, सहायक फौजदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 06:13 PM2020-10-15T18:13:59+5:302020-10-15T18:14:18+5:30

आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका

Assistant Inspector, Assistant Magistrate suspended for making confidential report viral | गोपनीय अहवाल व्हायरल केल्याबद्दल सहायक निरीक्षक, सहायक फौजदार निलंबित

गोपनीय अहवाल व्हायरल केल्याबद्दल सहायक निरीक्षक, सहायक फौजदार निलंबित

Next

पुणे : ससून रुग्णालयात उपोषण करणारे शैलेश जगताप यांना समुपदेशन करण्यास जाण्यास सांगितले असताना त्याचा अहवाल वरिष्ठ निरीक्षकांच्या निदर्शनास न आणता अनावश्यकरित्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यासाठी रिपोर्ट दिला. तसेच तो रिपोर्ट गोपनीय कामकाज पाहणारे सहायक फौजदार राजेश कांबळे यांना मोबाईलवर व्हाटसअपद्वारे पाठविला. हा रिपोर्ट अनेक व्हाटसअप ग्रुपवर व्हायरल झाल्याने शासकीय गोपनीयतेचा भंग झाल्याप्रकरणी दोघांना अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी निलंबित केले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे आणि सहायक फौजदार राजेश कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

निलेश घोरपडे व राजेश कांबळे हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. घोरपडे यांना ११ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता ससून रुग्णालयात न्यायालयीन बंदी शैलेश जगताप हे उपोषण करीत आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांचे समुपदेशन करण्याबाबत कळविले होते. घोरपडे यांनी राजेश कांबळे, महिला पोलीस शिपाई बोऱ्हाडे यांच्यासह जाऊन शैलेश जगताप यांची चौकशी केली़ त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक असतानाही उलट त्याने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल असल्याने, त्याचेवर दाखल असलेल्या गुन्ह्याचे फिर्यादी तसेच गुन्ह्याचे अंमलदार, सरकारी वकील यांची स्पेशल चौकशी कमिटी मार्फत चौकशी करावी. रास्ता पेठ येथील जागेचा ताबा घेण्यासाठी मोक्क्याचे गुन्हे दाखल करुन दबाव टाकत असल्यामुळे मी उपोषण करीत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे घोरपडे यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास न आणता अनावश्यकरित्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यासाठी रिपोर्ट दिला. तसेच रिपोर्ट नियंत्रण कक्ष येथे स्टेशन डायरी नोंद होण्याकामी तेथील हवालदारांच्या मोबाईलवर अनावश्यकरित्या पाठविला. हा स्टेशन डायरी रिपोर्ट सहायक फौजदार राजेश कांबळे यांच्या मोबाईलवर व्हाटसअपद्वारे पाठविला. हा रिपोर्ट व्हायरल झाल्याने त्याचा परिणाम शैलेश जगताप यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचे तपासी अंमलदार, फिर्यादी तसेच या गुन्ह्याचे कामकाज पाहणारे सरकारी वकील व इतरांच्या भूमिकेबाबत संदेह निर्माण होऊन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.

त्याचप्रमाणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करुन आरोपीना मदत करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे स्पष्ट होत आहे. या हलगर्जीपणा, बेजबाबदारपणाच्या गैरकृत्यासाठी दोघांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी दिला आहे़

Web Title: Assistant Inspector, Assistant Magistrate suspended for making confidential report viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.