पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आशा भोसले पुरस्कार रूपकुमार राठोड यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:30 PM2019-03-05T16:30:22+5:302019-03-05T16:38:50+5:30

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून संगीत विषयक अभिरूची रूपकुमार यांना असून राठोड यांनी हिंदी, मराठी, उदू अशा तेरा भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांचे १७ अल्बम प्रसिद्ध झाले आहे.

Asha Bhosale Award for Pimpri Chinchwad Natya Parishad announced to Roopkumar Rathod | पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आशा भोसले पुरस्कार रूपकुमार राठोड यांना जाहीर

पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आशा भोसले पुरस्कार रूपकुमार राठोड यांना जाहीर

Next

पिंपरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत १७ वा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांना जाहिर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.     

आशा भोसले पुरस्काराचे यंदाचे सतरावे वर्ष असून हा पुरस्कार देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिला जातो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा , सुरेश वाडकर, हरीहरन व सोनू निगम, सुनिधी चौव्हाण, उदित नारायण यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे.  देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो. 
वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून संगीत विषयक अभिरूची रूपकुमार यांना असून राठोड यांनी हिंदी, मराठी, उर्दू अशा तेरा भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांचे १७ अल्बम प्रसिद्ध झाले आहे. संगीतकार आणि गझल गायक म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. १९९७ मध्ये बॉर्डर चित्रपटातील  संदेसे आते है....  देशभक्तीपर गीत तरूणाईच्या ओठावर होती. तसेच तेरे नाम, तेजाब, मदहोशी, जहर, नजर, धूमधडाका, लाईफ एक्सप्रेस आणि मराठी चित्रपट गुलमोहरलाही संगीत दिले आहे.  पुरस्कार वितरण शनिवार दिनांक. ९ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे. यावेळी पुस्काराचे वितरण  माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार असून, जेष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, महापौर राहूल जाधव, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पाटील, विरोधी पक्षनेता दत्तात्रय  साने आदी उपस्थित राहणार आहे.

Web Title: Asha Bhosale Award for Pimpri Chinchwad Natya Parishad announced to Roopkumar Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.