Ajit Pawar : "गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारला हे कशावरून? काहीवेळा...." 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 04:55 PM2021-07-02T16:55:42+5:302021-07-02T17:12:18+5:30

काही वेळा असंही होतं की बरेच जण स्वतःचंच नुकसान करतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात.

Ajit Pawar : " Why did NCP workers throw stones on Gopichand Padalkar's car? Sometimes..." | Ajit Pawar : "गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारला हे कशावरून? काहीवेळा...." 

Ajit Pawar : "गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारला हे कशावरून? काहीवेळा...." 

Next

पुणे: भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पडळकर यांच्या टीकेनंतर राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील पडळकरांच्या तोडफोड प्रकरणावर भाष्य केले आहे.               

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवारांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. 
पवार म्हणाले, गोपीचंद पडळकरांना आम्हीच विरोधक आहोत. म्हणून ते आमच्यावरच आरोप करणार आहे. त्यांच्या गाडीवर दगड राष्ट्रवादीनेच मारला कशावरून? काहीवेळा असंही होतं की, बरेच जण स्वतःचंच नुकसान करतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. काय सांगता येतं..? मी विचारांची लढाई विचारांनीच लढावी असं माझं मत आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण? 
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती.गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.गाडीवर हल्ला करणारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामलाल चौकातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Ajit Pawar : " Why did NCP workers throw stones on Gopichand Padalkar's car? Sometimes..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.