"अजित पवारांनी लक्षात ठेवावं, आम्ही त्यांचे बाप आहोत"; चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 07:09 PM2020-10-10T19:09:27+5:302020-10-10T19:22:34+5:30

महापालिकेच्या सत्तेच्या बाबतीत जर अजित पवार यांना काही स्वप्नं पडत आहे. मात्र त्यांनी ती पाहण्यात आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नये.

"Ajit Pawar should remember, we are his father"; Chandrakant Patil took aim | "अजित पवारांनी लक्षात ठेवावं, आम्ही त्यांचे बाप आहोत"; चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा 

"अजित पवारांनी लक्षात ठेवावं, आम्ही त्यांचे बाप आहोत"; चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा 

Next

पुणे: उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना जर पुणे महापालिकेच्या सत्तेविषयी काही स्वप्नं पडत असतील तर त्यांनी ही स्वप्न पाहण्यात जास्त जास्त ऊर्जा वायाला घालवू नये. कारण त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी ती म्हणजे आम्ही पण त्यांचे बाप आहोत. अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. 
पाटील म्हणाले, “पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १५ पैकी ११ ठिकाणी भाजपाने अध्यक्षपद मिळवत वर्चस्व मिळवले आहे. आणि एक जागेवर काँग्रेसकडे गेली आहे. अन्य ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. मात्र प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्वच जागांवर भाजपाचे अध्यक्ष व्हायला हवे होते.. मात्र, तसे घडले नाही. परंतु, महापालिकेच्या सत्तेच्या बाबतीत जर अजित पवार यांना काही स्वप्नं पडत आहे. मात्र त्यांनी ती पाहण्यात आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नये. कारण आम्ही देखील तुमचे बाप आहोत. 

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी असे नेते आहेत ज्यांना सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि सन २०२०च्या निवडणुकीत ३०३ खासदार आपले मिळाले आहेत. भाजपाला मदत करणारे सहयोगी खासदार सध्या १०३ वरुन १५३ आहेत. इतक्या मोठ्या संख्याबळ असलेल्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा. 

रोहित पवारांबाबत चंद्रकांत पाटील काय म्हणाले... 

मोठ्या व्यक्तींवर टीका केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धीच मिळत नाही. अशा व्यक्तींना प्रसार माध्यमांनी समजून सांगायला हवे की, टीका केल्याखेरीज देखील आम्ही तुम्हाला कव्हरेज देऊ.  मग ते कदाचित टीका करणे बंद करतील अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना नामोल्लेख न करता सणसणीत टोला लगावला. 

 पुण्यात भाजपच्या एका कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींवर विविध मुद्दे उपस्थित करून टीका करताना दिसतात. त्याचाच संदर्भ घेत पाटील यांनी रोहित पवारांना लक्ष केले. 

Web Title: "Ajit Pawar should remember, we are his father"; Chandrakant Patil took aim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.