Ajit Pawar : कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला याची माहिती जाहीर करा; अजित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:10 PM2021-05-14T15:10:45+5:302021-05-14T15:11:00+5:30

ज्या कोणत्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण जास्त आढळून येत आहेत, तिथे अधिक क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा करणे  गरजेचे आहे. 

Ajit Pawar : Declare how much oxygen was supplied to which states; Ajit Pawar's demand to the central government | Ajit Pawar : कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला याची माहिती जाहीर करा; अजित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी 

Ajit Pawar : कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला याची माहिती जाहीर करा; अजित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी 

Next

पुणे : राज्य सरकार कोरोना काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या संकटावर मात करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. तसेच राज्य सरकार 3 हजार मॅट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत आहे .मात्र, याचवेळी केंद्र सरकारने कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला याची माहिती जाहीर करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. पवार म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. आम्ही ऑक्सिजनच्या जास्तीत जास्त निर्मितीसाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, केंद्र सरकारने देखील ज्या कोणत्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण जास्त आढळून येत आहेत, तिथे अधिक क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा करणे  गरजेचे आहे. 

तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेची तयारी सुरू
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुशंगानं पुण्यातही तिसऱ्या लाटेसाठीची पूर्वतयारी सुरू करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. ऑक्सिजनबाबतची राज्याची १२०० मेट्रिक टनची तयारी आता १८०० ने वाढवायची आहे. प्रशासन यंत्रणा रात्रंदिवस काम करते आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेची तयारी याआधीच सुरू करण्यात आली आहे, अशीही माहिती पवार यांनी यावेळी दिली. 

१० कोटींपर्यंत लस उत्पादन करण्याचं नियोजन

देशात सर्व नागरिकांसाठी लस गरजेची आहे. लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आल्याचंही दिसून आलं आहे. पण लस उत्पादन क्षमता मर्यादित आहे. १० कोटींपर्यंत लस उत्पादन करण्याचं नियोजन आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

Read in English

Web Title: Ajit Pawar : Declare how much oxygen was supplied to which states; Ajit Pawar's demand to the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.