After giving birth to a girl for the third time, the mother drowned her 15-month-old daughter | तिसऱ्यांदा मुलगी झाल्याने आईनेच सव्वा महिन्याच्या बालिकेला पाण्यात बुडवून मारले

तिसऱ्यांदा मुलगी झाल्याने आईनेच सव्वा महिन्याच्या बालिकेला पाण्यात बुडवून मारले

सांगवी : सव्वा महिन्याच्या मुलीच्या खुनानंतर बारामती तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर  मुलगा न झाल्याच्या कारणावरून तिसऱ्यांदा जन्म दिलेल्या सव्वा महिन्याच्या मुलीचा आईनेच खून केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. यामुळे आईला पोलिसांनी आज अटक केली असल्याची माहिती माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस णीरीकह महेश विधाते यांनी दिली.

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे अवघ्या सव्वा वर्षाच्या मुलीचा खून झाल्याची घटना घडल्या नंतर तालुक्यात चांगलीच हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र, ९ महिने उदरात राहून जग पाहण्यासाठी आलेल्या सव्वा महिन्याच्या मुलीचा पोलीस चौकशीत आईनेच खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी (दि.२५) रोजी ही घटना घडली होती. या प्रकरनी बारामती ग्रामीण पोलिसांनी आई दिपाली संदीप झगडे रा. काटेवाडी ( ता. बारामती)  हिला आज ( दि. २९) रविवारी पोलिसांनी अटक केली आहे.

 तिसऱ्यांदा मुलगी झाली असल्याने आई दिपाली नैराश्यात होती.तिला मुलगा हवा होता. मात्र, सुदैवाने तिला तिच्या झोळीत  तिसऱ्यांदा मुलगी जन्माली आली. आणी आईच्याच हातून तिचा खून झाला आहे. या घटनेमुळे आता तालुक्यात चांगलीच  खळबळ उडाली असून. चर्चेला उधाण आले आहे. बारामती ग्रामीण पोलिसांनी या घटनेच्या तपासाला कसून सुरुवात केली.तपासात हा खून आईनेच केला असल्याचे निष्पन्न झालं आहे. आई याबाबत सविस्तर माहिती अशी की दिपाली संदीप झगडे ही काटेवाडी ता. बारामती येथील दिपाली झगडे ही प्रसूतीसाठी माहेरी माळेगाव येथे वडिल संदीप जाधव यांच्या घरी आली होती. यावेळी  सव्वा महिन्याच्या मुलीला पाळण्यात झोपवले होते. झोपेतून उठल्यावर पाहिले असता. ती पाळण्यात दिसली नव्हती. त्यानंतर तिची शोधाशोध सुरू झाली होती. त्यानंतर ती कुठेही सापडली नाही. यामुळे मुलीचे  आजोबा संजय जाधव यांनी माळेगाव दूरक्षेत्रात जाऊन  खबर दिली होती. त्यानंतर तिचा घराजवळील पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला होता.


ही घटना घडताच क्षणी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली होती. त्यानंतर सर्व नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन रात्री उशिरा पर्यंत पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली होती. मात्र, या चौकशी दरम्यान कोणीही खुनाची कबुली देण्यात तयार नव्हते. यानंतर आज साक्षीदार यांच्यासह आईची चौकशी करण्यात आली. यावेळी आईची नैराश्यता आणी अनेक जाणांची केलेली चौकशी यातून आईच दोषी असल्याचे निष्पन्न झाले. आणी आईला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After giving birth to a girl for the third time, the mother drowned her 15-month-old daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.