पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणखी साडेसहा कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 08:17 PM2020-02-04T20:17:31+5:302020-02-04T20:20:37+5:30

शहर आणि जिल्ह्यासह ग्रामीण भागात २५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रचंड मोठी अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

An additional 6 crores 50 lakhs rupees were sanctioned to help flood victims | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणखी साडेसहा कोटींचा निधी मंजूर

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणखी साडेसहा कोटींचा निधी मंजूर

Next
ठळक मुद्देपूरग्रस्त बांधित : वाढीव रक्कमेचे लवकरच वाटप सुरु होणार जिल्हा प्रशासनाला हा निधी प्राप्त झाल्याबरोबर बाधित कुटुंबांना तात्काळ वितरीत

पुणे : शहर आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे बांधित झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने केली होती. त्यानुसार राज्य शासनाने नुकताच सुमारे ६ कोटी ४४ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शासनाच्या नियमानुसार बांधित लोकांना वाढीव निधीचे वाटप सुरु करणार असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. 
शहर आणि जिल्ह्यासह २५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रचंड मोठी अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, अनेकांचे संसार उद्वस्त झाले. काही नागरिकांनी आपले प्राण देखील गमावले. तर मोठ्या प्रमाणात प्राण हानी व वित्तीय हानी देखील झाली. या सर्व पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने  शासनाकडे निधीची मागणी केली होती. यामध्ये पहिल्या टप्प्यात तातडीने मदत केली. परंतु शासनाच्या स्वतंत्र अदेश काढून वाढीव मदत करणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार जिल्ह्यासाठी अधिकच्या निधीची गरज असल्याचे जिल्हाधिकाºयांनी शासनाला लेखी कळविले होते. त्यानुसार हा निधी मंजूर केला आहे. 
जिल्हा प्रशासनाला हा निधी प्राप्त झाल्याबरोबर बाधित कुटुंबांना तात्काळ वितरीत करण्यात यावा. सदर निधी ज्या हेतूसाठी वर्ग केला आहे. त्याच कारणासाठी वापरावा. कोणत्याही परिस्थितीत मंजूर निधीपेक्षा अधिक खर्च होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, तसेच वितरीत अनुदानातून जर काही रक्कम खर्ची पडणार नसेल तर ती विहित वेळेत शासनास समर्पित करावी, अशा सूचना महसूल विभागाचे उपसचिव सु. ह. उमरणीकर यांनी दिल्या आहेत.

Web Title: An additional 6 crores 50 lakhs rupees were sanctioned to help flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.