Accident at Warje flyower | वारजे उड्डाणपुलावर भीषण अपघात ; कारचा झाला चेंदामेंदा
वारजे उड्डाणपुलावर भीषण अपघात ; कारचा झाला चेंदामेंदा

पुणेपुणे सातारा महामार्गावर वारजे उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका कारचा चक्काचूर झाला आहे. यात कारचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाेन ट्रकच्यामध्ये सापडल्याने कारचा चक्काचूर झाला. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदणी चाैकाकडून कात्रच्या दिशेने जाताना आज सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. पुणे सातारा महामार्गावरील पाॅप्युलर पुल ओलांडल्यानंतर हा अपघात झाला. कारच्या पुढे असणाऱ्या टॅंकरने अचानक ब्रेक दाबला. कारच्या चालकाने प्रसंगावधान राखत कार नियंत्रणात आणली. परंतु उतार असल्याने कारच्या मागून एक कंटनेर जाेरात आला आणि त्याने कारचा धडक दिली. ही धडक इतकी भीषण हाेती की कार पुढील टॅंकरवर जाऊन जाेरात आदळली. दाेन्ही जड वाहनांच्या मध्ये कार सापडल्याने कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने कारमध्ये एअरबॅग असल्याने कार चालकाचे प्राण वाचू शकले. धडक बसल्यानंतर दाेन्ही जड वाहनांचे चालक वारजे पाेलीस चाैकीत जात त्यांनी पाेलिसांना अपघाताची माहिती दिली. पाेलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल हाेत जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. 

अपघात इतका जाेरदार हाेता कारचा चालक वाचू शकणार नाही असे प्रत्यक्षदर्शींना वाटले. परंतु कारमध्ये असणाऱ्या एअरबॅगमुळे चालकाचे प्राण वाचले. दरम्यान या अपघातामुळे माेठी वाहतूक काेंडी या भागात झाली हाेती. पाेलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कारला बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

नागरिकांची असंवेदनशीलता
अपघात झाल्यानंतर कारचा चेंदामेदा झाला हाेता. दाेन्ही वाहनांच्या मध्ये कार अडकली हाेती. कारचा चालक वाचवा वाचवा असे ओरडत असताना अपघाताच्या ठिकाणी असणारे काही प्रत्यक्षदर्शी व्हिडीओ शुटींग काढण्यात व्यस्त हाेते. त्यापैकी काेणीही चालकाचे प्राण वाचविण्यासाठी पुढे आले नाही. अखेर पाेलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाेलिसांनी चालकाला कारमधून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Accident at Warje flyower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.