Accident: पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:20 PM2021-12-01T19:20:38+5:302021-12-01T19:20:46+5:30

अपघात पुणे - नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत दळवीमळा येथे रात्री झाला

accident truck hits two wheeler on pune nashik highway husband killed and wife injured | Accident: पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी

Accident: पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी

googlenewsNext

मंचर : ट्रकने मोटारसायकलला समोरून धडक देऊन झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी झाली आहे. हा अपघातपुणे - नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत दळवीमळा येथे रात्री झाला. राजेश अशोक जाधव (वय 26 रा. खेड  थिगळस्थळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश अशोक जाधव व निशा राजेश जाधव हे पती - पत्नी मोटरसायकल वरून जुन्नर येथून खेडकडे चालले होते. त्याचवेळी एक ट्रक पुणेनाशिक महामार्गावर पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे भरधाव वेगाने चालला होता. कळंब गावच्या हद्दीत दळवीमळा येथे भरधाव वेगातील ट्रकने मोटरसायकलला समोरून धडक दिली.

या अपघातात मोटारसायकल चालक राजेश अशोक जाधव (वय 26) यांच्या डोक्यास, दोन्ही हाताला, डाव्या पायाला, छाती व पोटाच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या निशा राजेश जाधव (वय 22) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी सुरवातीला मंचर येथील खासगी रुग्णालयात व नंतर पुणे येथे नेण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. यासंदर्भात किरण अशोक जाधव यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत. 

Web Title: accident truck hits two wheeler on pune nashik highway husband killed and wife injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.