नारायणपूरला पुण्याच्या MIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; दोन ठार, पाच गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 11:15 PM2022-10-03T23:15:21+5:302022-10-03T23:17:31+5:30

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात तेथीलच मेघमल्हार टि हाउस व शिवलक्ष्मी दुकानाला धडक देवून उलटी झाली.

Accident involving students of Pune's MIT College at Narayanpur; Two killed, five seriously injured | नारायणपूरला पुण्याच्या MIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; दोन ठार, पाच गंभीर जखमी

नारायणपूरला पुण्याच्या MIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; दोन ठार, पाच गंभीर जखमी

googlenewsNext

जेजुरी- नारायणपूर, ता पुरंदर जि पुणे येथील सासवड - कापूरहोळ रस्त्यावरील दत्तमंदीराशेजारी एका महिद्रा कंपनीच्या XUV ३०० गाडीचा भीषण अपघात होवून त्यामध्ये दोन जनांचा जागीच मृत्यू तर पाचजन गंभीर जखमी असून त्यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. 

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात तेथीलच मेघमल्हार टि हाउस व शिवलक्ष्मी दुकानाला धडक देवून उलटी झाली. अपघात ऐवढा भीषण होता की गाड़ी धडकून वाहनाचा जागीच चक्काचूर झाला होता. नारायणपूरचे स्थानिक नागरीक भानुदास बोरकर, रामभाउ बोरकर, सचिन झेंडे, भरतनाना क्षिरसागर यांनी तात्काळ जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून सासवड ग्रामीण रूग्णालय येथे उपचारकामी दाखल केले.

त्यातील १. रचित मोहता वय १८ वर्षे, रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल, २. गौरव लालवानी वय १९ वर्षे, रा रायपूर, छत्तिसगढ़ यांना डॉक्टरांनी दाखलपूर्व म घोषित केले. तर इतर पाच जणांना पुढील उपचारकामी ससुन रूग्णायल येथे हलवले. त्यापैकी दोघाजणांची प्रकृती गंभीर असून त्यांचेवर ससुन रूग्णालय येथे उपचार चालू आहेत. नमूदचे विदयार्थी हे विविध राज्यातील असून ते सर्वजन MIT कॉलेज कोथरूड,पुणे येथे विविध विभागामध्ये शिक्षण घेत आहेत. सदर घटनेबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे फेटल अपघात दाखल झाला असून पोलिस निरीक्षक. आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक. विनय झिंजुर्के हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Accident involving students of Pune's MIT College at Narayanpur; Two killed, five seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.