कठीण समय येता ‘अभय’ योजना कामास येते; पालिकेची अर्थव्यवस्था तरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 07:43 PM2021-01-25T19:43:37+5:302021-01-25T19:46:10+5:30

अभय योजनेमधून तब्बल ४७७ कोटी २० लाखांच्या थकबाकीची वसुली...

The 'Abhay' scheme works In difficult times; The economy of the municipality collapsed | कठीण समय येता ‘अभय’ योजना कामास येते; पालिकेची अर्थव्यवस्था तरली

कठीण समय येता ‘अभय’ योजना कामास येते; पालिकेची अर्थव्यवस्था तरली

Next
ठळक मुद्देयंदाच्या २५ जानेवारीपर्यंत १ हजार ३८० कोटी रुपयांचे मिळाले उत्पन्न

पुणे : वैश्विक महामारी ठरलेल्या कोरोनामुळे राज्यातील सर्वच महापालिका आणि नगरपालिकांचे आर्थिक उत्पन्न घटलेले आहे. त्याचा परिणाम विकासकामांवरही झाला आहे. परंतु, या आर्थिक संकटाच्या काळातही पालिकेला ‘अभय योजने’ने तारले आहे. या योजनेमधून पालिकेला तब्बल ४७७ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मिळकत कर हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्याच्यावर खर्चाचा डोलारा उभा आहे. त्या खालोखाल उत्पन्न असलेल्या बांधकाम विभागाचे उत्पन्न यंदा मात्र घटले आहे. पालिकेला दरवर्षी मिळकतकरातून साधारण बाराशे कोटी रुपये उत्पन्न मिळते. यंदाच्या २५ जानेवारीपर्यंत १ हजार ३८० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. 

स्थायी समितीने निर्णय घेऊन १ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत अभय योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत थकीत मिळकतकरावरील दंडामध्ये ८० टक्के सूट देण्यात आली. या कालावधीत तब्बल १ लाख १४ हजार ६३१ थकबाकीदारांनी ३५१ कोटी १८ लाख रुपये मिळकतकर जमा केला. नागरिकांच्या मागणीनुसार, या योजनेला १० डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीत थकबाकी भरणाऱ्यांना दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात आली. स्थायी समितीने पुन्हा या योजनेस २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत दंडामध्ये ७० टक्के सवलत देण्यात आली. या कालावधीत ३४ हजार १७९ थकबाकीदारांनी १२६ कोटी १ लाख रुपये थकबाकी भरली. 
असे १ क्टोबर ते २५ जानेवारी या कालावधीमध्ये १ लाख ४८ हजार ८१० मिळकतधारकांनी ४७७ कोटी २० कोटी रुपयांची थकबाकी भरली. 
====
कोरोना कालावधीत पुणेकरांनी पालिकेवर विश्वास दाखवत मोठ्याप्रमाणावर थकबाकी भरली आहे. मिळकतकर उत्पन्नाच्या बाबतीत पुणे महापालिका राज्यात आघाडीवर आहे. १ लाख ४८ हजार ८१० जणांनी ४७७ कोटी २० लाख रुपये थकबाकी भरली आहे. थकबाकीदारांनी नियमित कर भरणा करावा. मिळकतकर विभागाने चांगली कामगिरी केली आहे. पालिकेचे वार्षिक उत्पन्न साडेचार हजार कोटींपर्यंत जाईल. त्यामुळे विकासकामांना गती मिळू शकेल. 
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती.

Web Title: The 'Abhay' scheme works In difficult times; The economy of the municipality collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.