खेड तालुक्यात कोरोना तपासणीच्या आधीच ६० वर्षीय नागरिक व एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 02:30 PM2020-05-27T14:30:46+5:302020-05-27T14:31:10+5:30

खेड तालुक्यातील जनता धोक्याकडे होते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

A 60-year-old citizen and a 25-year-old youth died in Khed taluka before the corona test | खेड तालुक्यात कोरोना तपासणीच्या आधीच ६० वर्षीय नागरिक व एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

खेड तालुक्यात कोरोना तपासणीच्या आधीच ६० वर्षीय नागरिक व एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

googlenewsNext

राजगुरुनगर. खेड तालुक्यात कोरोना चाचणी होण्याअगोदरच दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व एका २५ वर्षीय युवकांचा समावेश आहे.याबाबत माहिती अशी की, चासची पापळवाडी (ता खेड ) येथे एक ६० वर्षाचा जेष्ठ नागरिक मुंबईवरून आला होता. दरम्यान पापळवाडी येथे एका कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्याला काही दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. पुणे येथे तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. मात्र , तपासणी अगोदरच बुधवारी (दि. २७ )पहाटे औध येथील रुग्णालयात मृत्यू झाला. आज सकाळी (दि. २७ ) त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार होती. 
तसेच वाडा (ता. खेड )येथेही (दि. २२) मे रोजी मुंबईवरून एक २५ वर्षीय युवक आला होता. त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्याने वाडा येथे प्राथमिक उपचार म्हणून गोळ्या औषधे घेतली होती. दि. २६ रोजी त्याची तब्येत खालावल्यामुळे पुढील उपचारासाठी वाडा येथुन नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

धोक्याकडे होते जाणीवपूर्वक दुर्लक्ष...
खेड तालुक्यात मुंबई व पुण्याहून मोठ्या प्रमाणात लोकं गावी आले आहेत. त्यांची संख्या हजोरांच्या घरात आहे. परवानगी घेऊन येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन केले जा असले तरी काहीजण विनापरवानगी तालुक्यात प्रवेश करीत आहे. अशा नागरिकांमुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका आहे. मुक्तपणे वावरणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात कधी कोण येईल हे सांगता येत नाही याकडे खेड तालुक्यातील जनता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे

Web Title: A 60-year-old citizen and a 25-year-old youth died in Khed taluka before the corona test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.