भरधाव कंटेनरच्या धडकेत ४ म्हशींचा मृत्यू; मुंबई- बेंगळरु महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 01:37 AM2020-09-18T01:37:25+5:302020-09-18T01:39:43+5:30

या अपघातांनंतर कंटेनरही उलटला..

4 buffaloes died in fast container accident ; Incident on Mumbai-Bengaluru highway | भरधाव कंटेनरच्या धडकेत ४ म्हशींचा मृत्यू; मुंबई- बेंगळरु महामार्गावरील घटना

भरधाव कंटेनरच्या धडकेत ४ म्हशींचा मृत्यू; मुंबई- बेंगळरु महामार्गावरील घटना

Next
ठळक मुद्देभारती विद्यापीठ पोलिसांनी कंटनेर चालकाला घेतले ताब्यात

पुणे : मुंबई -बेंगळरू बाह्य वळण महामार्गावरील दरी पुलावर भरधाव कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ४ म्हशींचा मृत्यु झाला. अपघातानंतर कंटेनर उलटला.ही घटना दरी पुलावर गुरुवारी सायंकाळी घडली.

जांभुळवाडी भागातील रहिवासी ज्ञानोबा पंढरीनाथ जांभळे यांच्या मालकीच्या या ४ म्हशी होत्या. दरी पुलापासून काही अंतरावर त्या सायंकाळी चरण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या गोठ्याकडे परत येत होत्या.त्याचवेळी नवीन कात्रज बोगद्याकडून पुण्याकडे भरधाव वेगाने एक कंटेनर येत होता. ३ म्हशींना धडक देऊन कंटेनर पुढे गेला. त्यावेळी मागील बाजूच्या चाकात एक म्हैस अडकली. त्यामुळे कंटनेरने बरेच अंतर या म्हशीला फरफटत नेले. त्यानंतर तो उलटला. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड वाहतूक विभागचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने अवजड कंटेनर पूर्ववत केला. 
भारती विद्यापीठ पोलिसांनी कंटनेर चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे या महामार्गावर सायंकाळच्यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: 4 buffaloes died in fast container accident ; Incident on Mumbai-Bengaluru highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.