प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ३२ हजार घरांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 09:00 PM2019-03-09T21:00:31+5:302019-03-09T21:03:25+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ४ नुसार भोर व वेल्हा तालुक्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास (बीएलसी घटकांतर्गत) २.५ लाखापर्यंत २ हजार ४३६ लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

32,000 PMRDA houses sanctioned under Pradhan Mantri Yojana scheme | प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ३२ हजार घरांना मंजुरी

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ३२ हजार घरांना मंजुरी

Next
ठळक मुद्देपीएमआरडीएच्या प्रस्तावांना केंद्राकडून मान्यता, आणखी ३० हजार प्रस्तावित  

पुणे: केंद्र शासनातर्फे केंद्रीय संनियंत्रण व मान्यता समितीच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ३२ हजार ६२७ परवडणा-या घरांना मंजूरी देण्यात आली. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत आणखी ३० हजार १९१ सदनिका प्रस्तावित असून त्यातील २० हजार २०६ सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधणार आहेत. 
महाराष्ट्रात राज्यातील परवडणा-या घरांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक 3 नुसार एमएमआरडीएमार्फत माण-महाळूंगे नगर रचना योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटातील राखीव भूखंडावर १४ ठिकाणी सुमारे १३.३ हेक्टर क्षेत्रावर परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ (महाहौसिंग)सोबत संयुक्त भागीदारी तत्त्वावर ही घरे बांधण्यास पीएमआरडीएला मान्यता मिळाली आहे.या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न (ईडब्ल्यूएस)व अल्प उत्पन्न गटासाठी ६ हजार ५०३ परवडणा-या घरांची निर्मिती केली जाणार आहे.या योजनेमुळे माण-महाळुंगे परिसरातील लोकसंख्या १.५ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ४ नुसार भोर व वेल्हा तालुक्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास (बीएलसी घटकांतर्गत) २.५ लाखापर्यंत २ हजार ४३६ लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर खासगी विकासकाकडून घटक ३ नुसार परवडणा-या घरांची निर्मिती करण्यासाठी ६ विकसकांचा सहभाग मिळाला असून २३ हजार ६८८ घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी १३ हजार ७०३ घरांची निर्मिती शासकीय दराने केली जाणार आहे. त्याचप्रमाणे भागीदारीमधील परवडणा-या घटकांतील घरांसाठी २.५ लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. नागरिकांनी www.pZrdÔpZÔy.co या संकेतस्थळावर भेट द्यावी,असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात आली आहे.
-------------
वाघोली, भावडी, मुळशीत घरे 
हवेली तालुक्यातील भावडी येथे १८० ,आर्थिक दृष्ट्या दूर्बल घटकांसाठी वाघोलीत  425 परवडणा-या सदनिका,मुळशी तालुक्यात ७०३  तर लोणीकंदमध्ये १ हजार २७१,महाळुंगे येथे १० हजार ६१३ परवडणा-या सदनिका केल्या जाणार आहेत.माण-महाळुंगे येथे २ हजार ३८७ घरे निर्माण केली जाणार आहेत.

Web Title: 32,000 PMRDA houses sanctioned under Pradhan Mantri Yojana scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.