पुण्यात ६० वर्षाच्या ज्येष्ठाकडून ३ लाखांचा अंमली पदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 03:48 PM2021-09-14T15:48:35+5:302021-09-14T15:48:42+5:30

ज्येष्ठाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली

3 lakh drugs seized from 60-year-old in Pune | पुण्यात ६० वर्षाच्या ज्येष्ठाकडून ३ लाखांचा अंमली पदार्थ जप्त

पुण्यात ६० वर्षाच्या ज्येष्ठाकडून ३ लाखांचा अंमली पदार्थ जप्त

Next

पुणे : सिंहगड रोडवर अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या या ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. शम्स महम्मद अली झवेरी (वय ६०, रा. काशीमिरा रोड, ईस्ट मुंबई) असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख रुपयांचं २० ग्रॅम मेफेड्रॉन (एम डी), दोन मोबाईल, रोख रक्कम आणि कार असा ६ लाख २३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पेट्रोलिंग करीत होते. वडगाव येथील नवले पुलाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील चैतन्य बिअर शॉपी समोर एका जण कारसह संशयितरित्या थांबला असल्याचे या पथकाला आढळून आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. मुंबईहून अंमली पदार्थ विक्रीसाठी तो पुण्यात आला होता. झवेरी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: 3 lakh drugs seized from 60-year-old in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.