लोणावळ्यात २४ तासांत २६६ मिमी पाऊस; पावसाचा जोर कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 10:58 AM2019-08-03T10:58:49+5:302019-08-03T11:03:59+5:30

पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत तब्बल २६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

266 mm of rainfall in 24 hours in Lonavla; Rainfall sustained | लोणावळ्यात २४ तासांत २६६ मिमी पाऊस; पावसाचा जोर कायम 

लोणावळ्यात २४ तासांत २६६ मिमी पाऊस; पावसाचा जोर कायम 

Next
ठळक मुद्दे मागील आठ दिवसांपासून लोणावळा शहरात पावसाची संततधार सुरूआठ दिवसात लोणावळ्यात १५६५ मिमी पाऊस

लोणावळा : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत तब्बल २६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्राला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ग्रामीण भागात नदीला सर्वत्र पूर आला आहे. वाकसई चाळ, कार्ला, मळवली परिसरातील अनेक सोसायटय़ांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. सांगिसे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास टाटा कंपनीच्या लोणावळा धरणातून इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने लोणावळ्यातील नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे असा इशारा टाटा कंपनीकडून देण्यात आला आहे. मागील आठ दिवसांपासून लोणावळा शहरात पावसाची संततधार सुरू आहे. आठ दिवसात लोणावळ्यात १५६५ मिमी पाऊस झाला आहे. संततधार व मुसळधार कोसळणार्‍या पावसाने मावळ तालुक्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. 

 पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार 

मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पिण्याचे पाणी पुरविणारे मावळ तालुक्यातील पवना धरण 98 टक्के भरले असून धरणातून सध्या हायड्रो मार्गे १२०० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने धरणाचे दरवाजे उघडत दरवाजांमधून ३५०० क्युसेक व हायड्रोद्वारे १५५० क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग नऊ वाजल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण शाखा अभियंता यांनी दिली.

Web Title: 266 mm of rainfall in 24 hours in Lonavla; Rainfall sustained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.