पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना, नऱ्हे येथे गळफास घेऊन २० वर्षीय तरुणाने जीवन संपविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 05:09 PM2020-07-02T17:09:03+5:302020-07-02T17:09:23+5:30

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

20-year-old commits suicide by hanging at Narhe in Pune | पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना, नऱ्हे येथे गळफास घेऊन २० वर्षीय तरुणाने जीवन संपविले

पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना, नऱ्हे येथे गळफास घेऊन २० वर्षीय तरुणाने जीवन संपविले

googlenewsNext
ठळक मुद्देआत्महत्त्येचे सत्र थांबेना; आत्महत्या रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न  

पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार गुरुवारी (दि.२) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडीस आला. यश शिवाजी खोपडे (वय २०, वेताळबुवा चौक, भैरवनाथ नगर, नऱ्हे, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा पदवीचे शिक्षण घेत होता. ढोलपथकातही तो वादन करण्यासाठी जात असे तसेच त्याला पेटींग करण्याचा छंद होता. त्यामुळे त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून नऱ्हे गावातच जेएसपीएम कॉलेज जवळील राधेय अपार्टमेंटमध्ये तीन दिवसांपूर्वी भाड्याने फ्लॅट घेतला. त्यानंतर बुधवारी रात्री यशने मित्राकडून त्या फ्लॅटची चावी घेऊन त्या ठिकाणी गेला होता. बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास तो फ्लॅटमध्ये गेल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मित्रांनी फ्लॅटचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून मित्रांनी आत प्रवेश केला असता त्याने पंख्याच्या हुकाला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. अज्ञात कारणावरून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहे. 
......................
आत्महत्त्येचे सत्र थांबेना; आत्महत्या रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न  
शहरात सुरु असलेले आत्महत्येचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. आत्महत्या रोखण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घेतला असून व्यवसायिक व सर्वसामान्य नागरिकांना तसेच तरुणांना समुपदेशनाचे धडे दिले जात आहेत. त्यानुसार सर्वेक्षण, प्रशिक्षण, संवाद व समुपदेशनाच्या पातळीवर पुणे पोलीस नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Web Title: 20-year-old commits suicide by hanging at Narhe in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.