शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात १४0 सीसीटीव्ही बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 01:29 PM2020-02-11T13:29:09+5:302020-02-11T13:29:27+5:30

सुरक्षेसाठी वॉच ठेवणार

140 CCTVs will be installed In the area of Shivajinagar District Court | शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात १४0 सीसीटीव्ही बसविणार

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात १४0 सीसीटीव्ही बसविणार

Next
ठळक मुद्दे सीसीटीव्हीमुळे न्यायालयातील अनुचित प्रकार रोखता येणार

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात १४0 सीसीटीव्ही बसविणार सुरक्षेसाठी वॉच ठेवणार
पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर असताना न्यायालयामध्ये प्रमुख भागाम्ांध्ये आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवणार आहे. न्यायालयाच्या आतील भागातील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी न्यायालयाच्या परिसरामध्ये सुमारे १४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे.  
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयामध्ये डीएसके, माओवादी, जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट यासह अन्य महत्त्वाचे खटले सुरू आहेत. त्यामुळे या खटल्याच्या निमित्ताने न्यायालयात येणाºयांची संख्या अधिक असते. तसेच, खटल्याच्या निमित्ताने दररोज हजारो वकील, पक्षकार न्यायालयामध्ये दाखल होत असतात. न्यायालयात आरोपींना आण्यानंतर त्यांना भेटण्यासाठी येणाºया नातेवाईक, मित्रमंडळींची संख्या देखील अधिक आहे.  
न्यायालयातील प्रवेशद्वारांवर बसविलेले मेटल डिटेक्टरदेखील नावापुरतेच असल्यामुळे न्यायालयातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे 
गरजेचे होते. त्यामुळे न्यायालयात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीमुळे न्यायालयातील अनुचित प्रकार रोखता येणार आहेत. 
........
न्यायालयातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, याचे रेकॉडिंग पोलीस आयुक्तालयात होणार आहे. जिल्हा न्यायालयामध्ये अनेक महत्त्वाचे खटले सुरू आहेत. तसेच इतर खटल्यांच्या निमित्ताने हजारो लोकांची ये-जा सुरु असते. अशावेळी वकिलांवर, आरोपींवर हल्ला झाल्याच्या घटना घडतात. यापूर्वी त्या घडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हे सीसीटीव्ही बसविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. - अ‍ॅड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुुणे बार असोसिएशन.

Web Title: 140 CCTVs will be installed In the area of Shivajinagar District Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.