Mamata Banerjee: सरकार स्थापन करणार की राजीनामा देणार? ममता बॅनर्जी राज्यपालांच्या भेटीला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:19 PM2021-05-03T12:19:20+5:302021-05-03T12:24:02+5:30

West Bengal Results 2021: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सायंकाळी राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्या भेटीला जाणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून धनखड आणि ममता यांच्यामध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले होते.

Will Mamata Banerjee form a government or resign? will meet the Governor jagdeep dhankhar | Mamata Banerjee: सरकार स्थापन करणार की राजीनामा देणार? ममता बॅनर्जी राज्यपालांच्या भेटीला जाणार

Mamata Banerjee: सरकार स्थापन करणार की राजीनामा देणार? ममता बॅनर्जी राज्यपालांच्या भेटीला जाणार

Next

West Bengal Election Result Highlight: नाही नाही म्हणता पश्चिम बंगालमध्ये 213 जागांवर तृणमूल काँग्रेसने (TMC won) विजय मिळविला आहे. तर भाजपाने 77 जागांवर मुसंडी मारली आहे. असे जरी असले तरी तृणमूलच्या सर्वेसर्वा ममत बॅनर्जी (Mamata banrejee) यांचा पराभव झाला आहे. आपला नेहमीचा मतदारसंघ सोडून त्यांनी साथ सोडून भाजपात गेलेल्या सुवेंदू अधिकारी यांना पाडण्यासाठी नंदीग्राममधून निवडणूक लढविली होती. हा निर्णय त्यांना महागात पडला आहे. हाती प्रचंड बहुमत असले तरीही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. (Can Mamata Banerjee remain chief minister despite losing Nandigram? will meet jagdeep dhankhar today)

Mamata Banerjee: नंदीग्राम देवून 200 पार जाण्याचा 'फॉर्म्युला' होता खेला होबे? भाजपा अडकली अन् ममतांनी बाजी मारली 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीममता बॅनर्जी आज सायंकाळी राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्या भेटीला जाणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून धनखड आणि ममता यांच्यामध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले होते. भोजनाचे निमंत्रण देऊन त्यांना ममतांनी रिकाम्या पोटी पुन्हा माघारी धाडले होते. यासाठी त्यांनी मंत्रालयच बंद केले होते. यामुळे या दोघांमध्ये कमालीचे वितुष्ट आले आहे. अशातच मुख्यमंत्री कोण होणार, असा राजकीय पेच फसलेला असताना आज सायंकाळी ममता या जनखड यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. 

West Bengal Results 2021:पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा नाही, डाव्यांचा खेळ खल्लास; भाजपाला मतदारांनी दिला 'चकवा'


यामध्ये त्या सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचे समजते. तसेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार की पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा प्रस्ताव देणार हे सायंकाळीच समजणार आहे. असे असले तरीही ममता या मुख्यमंत्री होण्यासाठी कायदेशीर आधार घेऊ शकतात. 


पश्चिम बंगालचा निकाल काय?
निवडणूक आयोगानुसार पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 292 जागांवर मतदान झाले. यापैकी 211 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. तर दोन जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाने 77 जागा जिंकल्या आहेत. अन्यला दोन जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर उमेदवारांचा मृत्यू झाल्याने निवडणूक रद्द करण्यात आली होती. 

Mamata Banerjee: ...तरच ममता दीदी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; जाणून घ्या कायदेशीर तरतुदी

कशा होऊ शकतात पुन्हा मुख्यमंत्री?

पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी आता तिथे मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री होणार का? मात्र त्यांचा पराभव झाला असताना त्या पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. मात्र पराभवनंतरही ममता बॅनर्जी या पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात, तशी तरतूद संविधानात आहे. 

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आता विधानसभेचं सदस्य व्हावं लागणार आहे. यासाठी तृणमूल काँग्रेसच्या एखाद्या आमदाराला राजीनामा द्यावा लागेल. जेणेकरून त्या जागेवर पोटनिवडणूक होऊ शकेल. या जागेवर ममता बॅनर्जी यांना पुन्हा निवडणूक लढावी लागेल आणि विजयी व्हावं लागेल. या सर्वासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मात्र सहा महिन्यात विधानसभा सदस्य न झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही.  

मुख्यमंत्र्यांची निवड कशी होते?

भारतीय राज्यघटना कलम १६४नुसार राज्यपाल विधानसभा किंवा विधानपरिषदेतील बहुमत असलेल्या सदस्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करतात. सभागृहात बहुमत असलेल्या पक्षाचे सभागृहातील सदस्य आपला  नेता निवडतात. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीची सभागृहात विश्वासमताने निवड करतात. त्यानंतर सभागृह सदस्यांच्या शिफारसीनुसार राज्यपाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. पण भारतीय राज्यघटनेत मुख्यमंत्री किंवा मंत्रीपदाची शपथ घेतेवेळी ती व्यक्ती सभागृहाची सदस्यच असायला हवी असा उल्लेख नाही. मात्र मंत्रीपदी निवड झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आता सभागृह सदस्य होणे बंधनकारक आहे. सहा महिन्यात सभागृह सदस्य न झाल्यास ती व्यक्ती त्या पदावर राहू शकत नाही. 

Web Title: Will Mamata Banerjee form a government or resign? will meet the Governor jagdeep dhankhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.